Ticker

6/Breaking/ticker-posts

हिमवादळाचा कहर ; जनजीवन विस्कळीत,२१ ठार

 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

टेक्सास :- अमेरिकेच्या टेक्सास राज्यात हिमवादळ आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. हिमवादळ-हिमवृष्टीमुळे आतापर्यंत २१ जणांचा मृ्त्यू झाला आहे. तर, अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. अमेरिकेतील दक्षिण भागात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टी आणि हिमवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी तापमान आणखी घसरल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. टेक्सासमधील वीज विभागाने टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा खंडीत करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काही तासांसाठी ब्लॅक आउटची स्थिती निर्माण झाली होती. मुसळधार बर्फवृष्टीमुळे डॅलस आणि ह्युस्टनजवळील तापमान शून्य अंश सेल्सिअस खाली गेले होते.


वीज पुरवठा खंडीत झालेल्या भागात जीवनाश्यक वस्तू आणि इतर साहित्यांचा पुरवठा करण्यात येत असल्याचे राज्यपाल ग्रेग एबॉट यांनी सांगितले. खराब हवामानाचा फटका वीज निर्मितीवर झाला असून भारनियमन, ब्लॅक आउटचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. स्वयंपाकासाठी गॅस भरून घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.


राज्यपालांनी सांगितले की, ERCOT आणि PUC कडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. टेक्सासमधील नागरिकांना सर्वप्रकारची मदत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून वीज कमी प्रमाणात वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य प्रशासन वीज निर्मिती करणाऱ्या खासगी कंपन्यांसोबत काम करत असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.


ने नागरिकांना अनावश्यक उपकरणे अनप्लग करण्यास सांगितले आहे. त्याशिवाय काही दिवस कपडे न धुण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय लोकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरसारखे कपडे घालण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. खराब हवामानामुळे हवाई वाहतूकदेखील विस्कळीत झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या