Ticker

6/Breaking/ticker-posts

काळजी घ्या ! मुंबईतील 'या' भागांमध्ये हॉटस्पॉट..

 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई :-मुंबईत करोनाचा संसर्ग तीव्र असताना, पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील काही भाग हॉटस्पॉट ठरले होते. गेल्या काही महिन्यांत आटोक्यात येत असलेला करोना पुन्हा डोके वर काढत असून, यावेळीही उपनगरांमधील भाग पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरले आहेत. मुंबईत करोनाची साथ पुन्हा डोके वर काढत असून पूर्व व पश्चिम उपनगरांमधील पाच भाग पुन्हा एकदा हॉटस्पॉट ठरले आहेत. त्यात अंधेरी, बोरिवली, जोगेश्वरी, मुलुंड व चेंबूरचा समावेश आहे

  राज्यात ४,७८७ नव्या करोना रुग्णांची भर, ४० मृत्यू

राज्यात करोना संसर्गाबाबत चिंतेचे वातावरण आजही कायम असून आजही दिवसभरातील रुग्णवाढीचा विचार करता कालच्या तुलनेत आज नव्या रुग्णांची संख्या तब्बल १ हजार १२४ ने अधिक आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात ३ हजार ८५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून दिवसभरात ४ हजार ७८७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. काल ही संख्या ३ हजार ६६३ इतकी होती. आजची संख्या देखील बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येहून अधिक आहे. आज राज्यात एकूण ४० करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


काल ही संख्या ३९ इतकी होती. आजची मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता सध्या राज्यातील मृत्यूदर २.४९ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ८५ हजार २६१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६२ टक्के इतके झाले आहे. तसेच राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५४ लाख ५५ हजार २६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ७६ हजार ०९३ नमुने पॉझिटिव्ह निघाले आहेत. हे प्रमाण १३.४३ टक्के इतके आहे. सध्या राज्यात १ लाख ९५ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर १ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



राज्यात आज एकूण ३८ हजार ०१३ इतके रुग्ण अॅक्टिव्ह, म्हणजे उपचार घेत आहेत. राज्यातील प्रमुख शहरांचा विचार केल्यास मुंबईत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ५३० इतकी असून ठाण्यात ही संख्या ४ हजार ६८१ इतकी. तर, पुण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७ हजार ५०९, औरंगाबाद येथे ७५१, नागपूर येथे ५ हजार ०५, कोल्हापूर येथे १६३, नाशिक येथे ९८१ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त अॅक्टिव्ह रुग्णसंख्या पुण्यात असून सर्वात कमी रुग्णसंख्या गडचिरोली आहे. येथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५७ इतकी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या