Ticker

6/Breaking/ticker-posts

राजेंद्र उदागे यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान

 लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 अहमदनगर : येथील शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांना ग्रामीण विकास केंद्र जामखेड च्या वतीने आदर्श गांव पाटोदा चे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

       नुकताच जामखेड येथे प्रा. बाळासाहेब बळे यांच्या अध्यक्षतेखाली निवारा महोत्सव  पार पडला,त्यावेळी राजेंद्र उदागे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे,उसतोड कामगार संघटनेचे शिवराज बांगर,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,तहसीलदार विशाल नाईकवाडे,शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी इ मान्यवर यावेळी उपस्थित होते.

       राजेंद्र उदागे हे गेल्या पाच वर्षा पासून शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष असून संस्थेच्या वतीने विविध साहित्यिक व संस्कृतीक उपक्रम राबवीत आहेत,त्यांनी अहमदनगर केटरिंग असोशिएशन च्या माध्यमातून या उद्योगातील अनेकांना मदतीचा हात दिला आहे.तसेच कोरोना काळात रस्त्यावरील नागरिक, हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या रुग्णाचे नातेवाईकासह २०,००० हून जास्त गोरगरिबांनां पोटभर जेऊ घातल आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना 2020 या वर्षीचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देण्यात आल्याचे निवारा चे संस्थापक अरुण जाधव यांनी म्हटले आहे.राजेंद्र उदागे यांना  मिळालेल्या या पुरस्काराबद्दल शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी,प्रा.डॉ.अशोक कानडे,भगवान राऊत,भारत गाडेकर, वसंत डंबाळे,मकरंद घोडके यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या