लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी :- जिद्द व चिकाटीने व्यवसाय केल्यास यशस्वी उद्योजक म्हणून
नावलौकिक मिळवता येईल असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपूरे
यांनी व्यक्त केले . नगर मधील माणिक चौकातील सुप्रसिद्ध सोपानराव वडेवाले यांच्या तिसगाव
येथील नूतन शाखेचे उदघाटन राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपूरे यांच्या हस्ते करण्यात आले
त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिसगावचे सरपंच व जेष्ठनेते काशिनाथ
पाटील लवांडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती मिरझा मणियार,
माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, उद्योजक
संतोषशेठ छाजेड, मुक्ताजी भगत, विजय महांकाळ, सुनील परदेशी, शंकर उंडाळे, योगेश मैड,
दिलीप गांधी, भाऊसाहेब लोखंडे , दै पुढारीचे व्यवस्थापक अविनाश कराळे, उपसंपादक प्रशांत
वाव्हळ,आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री तनपूरे यांनी तिसगाव शाखेचे
चालक भाऊसाहेब लवांडे, सुनील अकोलकर यांचे कौतुक करत व्यवसायातील प्रगती बाबत समाधान
व्यक्त करत तुमच्याही शाखा बाहेर व्हाव्यात अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. राज्यमंत्री
तनपुरे यांनी विजधोरण जनतेच्य हिताचे असल्याची ग्वाही दिली. तिसगावचे
सरपंच काशिनाथ पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की तिसगाव मधील वातावरण हे
व्यावसायिकाना पोषक असल्याने बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. सोपानराव वडेवाले यांच्या
शाखेमुळे तिसगाव च्या वैभवात भर पडणार असल्याचे मत सरपंच लवांडे यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी उपसरपंच इलियास शेख, पृथ्वीराज आठरे,
मोहोज चे सरपंच सुधाकर वांढेकर, घाटशिरसचे सरपंच गणेश पालवे, नितीन लोमटे, आंबादास
शिंदे, जवखेडचे सरपंच अमोल वाघ, सचिन नेहुल , आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन
रफिक शेख यांनी तर प्रस्ताविक अशोक घाडगे यांनी केले.
0 टिप्पण्या