लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर :- जामखेड तालुक्यातील मोहा या
गावी रोजगार हमी योजनेअंतर्गत गेल्या ४ वर्षापासून रस्त्याच्या झालेल्या विविध कामांमध्ये
मोठ्या प्रमाणावर गैर व्यवहार झाले असून या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात येऊन संबंधीतांवर कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा
२ मार्च रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा गावातील सोमिनाथ डोंगरे व
संदीप डोंगरे यांनी दिला आहे.
श्री. डोंगरे यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो ) यांना यासंदर्भात एक निवेदन पाठवून
हा ईशारा देण्यात आला आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की , जामखेड
तालुक्यातील मोहा या गावी रोजगार हमी योजनेअंतर्गत
गेल्या ४ वर्षापासून रस्त्याची विविध विकास
कामे चालू करण्यात आली. यासाठी संबंधित यंत्रणेकडे मागणी करून कामे सुरू करण्यात आली.
परंतु संबंधित यंत्रणेकडून मजूर यादी मागून मस्टर तयार करण्यात आले होते. शासनाच्याच्या नियमांनुसार ६० वर्षापुढील लोकांना
या योजनेत काम करता येत नाही तसेच सदर काम देताही येत नाही असा स्पस्ट उल्लेख आहे .
तसेच काम सुरू झाल्यानंतर स्थापत्य अभियंता,रोजगार सेवक , ग्रामसेवक आदींनी मस्टर मागणी करताना ह्या सर्व बाबी तपासून पाहणे गरजेचे
असते. असे असताना या सर्व कामावर वृद्ध व्यक्ति कामावर दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे
या कामामध्ये मोठा घोटाला झालेला आहे.
या मध्ये मोहा ते डोर्ले रास्ता खडीकरण
, बांगर वस्ती ते चितखोरी रस्ता खडीकरण व बांगर वस्ती ते चितखोरी रस्ता अशा तिन्ही रस्त्यावर
सर्व मस्टर मध्ये वृद्ध व्यक्तींचे नावे आहेत, याचा अर्थ हे वृद्ध कामावर गेलेले नाहीत. त्यामुळे या योजेनेत लाखो रूपयांचा
भ्रष्टाचार झाल्याचा आरोप डोंगरे यांनी केला आहे. यामध्ये या सर्व कामांचे मस्टर नंबरसह
तपशील दिला आहे. तरी याबत आपण तातडीने लक्ष
घालून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व
दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा २ मार्च रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा गावातील सोमिनाथ डोंगरे व संदीप डोंगरे यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या