Ticker

6/Breaking/ticker-posts

आ . जगतापांच्या पाठपुराव्याला यश ; शहरातील 'या' कामांसाठी निधी मंजूर ..!लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर ः कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम व महापालिकेच्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या  पाठपुराव्याला यश आले असून निधी मंजूर झाला आहे .

याप्रसंगी बोलताना आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी सांगितले की, आज दि. १० फेब्रुवारी २०२१ रोजी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे राज्यस्तरीय विभागीय जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडली.

या बैठकीत विशेष बाब म्हणून आपल्या अहमदनगर महानगरपालिकेच्या आर्थिक उत्पन्नवाढीसाठी 2 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प तसेच कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आला व याबाबत तत्काळ कार्यवाही करणेबाबत जिल्हा अधिकारी अहमदनगर यांना माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी आदेश दिले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री , छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या