Ticker

6/Breaking/ticker-posts

करोडी ग्रामपंचायतीमध्ये गावकऱ्याच्या आग्रहखातर विरोधक एक..!

 सरपंचपदी आश्रू भागीनाथ खेडकर  तर उपसरपंचपदी डॉ. राजेंद्र खेडकरलोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

चिंचपुर पांगुळ :-पाथर्डी तालुक्यातिल करोडी ग्रामपंचायतीमध्ये जय शनीमारुती ग्रामविकास परिवर्तन व शनीमारुती प्रतिष्ठान विकास  पॅनलने  तसेच जय हनुमान पॅनल  यांनी युती करून ,सरपंच उपसरपंच निवड बिनविरोध केली आहे.

सरपंचपदी जेष्ठ सदस्य आश्रू भागीनाथ खेडकर यांना विराजमान केले आहे. तर उपसरपंचपदावर माजी पंचायत समिती सदस्य सौ.सुमनताई खेडकर यांचे पती  डाॅ. राजेंद्र खेडकर  यांची वर्णी लागली असून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कायापालट करण्यासाठी  सर्व ग्रामस्थ च्या पाठींब्याने आम्ही सर्व एकत्र येऊन सत्ता स्थापन केली आहे असे डॉ खेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले  .

 करोडी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य बाबासाहेब महादेव खेडकर, मनिषा सतिष खेडकर, दिनकर काशिनाथ खंडागळे, मंगल शिवनाथ वारे, सुनिता सतीश गोल्हार, सुनीता नरेंद्र खेडकर, सविता सागर खेडकर तसेच इतर ग्रामस्थ उपस्तीत होते. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या