Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक : एकाच कुटूंबातील चौघांची आत्महत्या

 डॉक्टर पती, पत्नी, दोन मुलांचा समावेश । राशिन येथील घटना 








.





लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

राशिन : -कर्जत तालुक्यातील राशिन येथील डॉक्टर महेंद्र थोरात यांच्यासह त्याची पत्नी व मुलगा यांनी आत्महत्या केली आहे. डॉ. महेंद्र थोरात यांनी आत्महत्या करताना एक चिट्ठी लिहून ठेवलेली आहे. महेंद्र जालिंदर थोरात, त्यांची पत्नी वर्षा (वय 42), त्यांचा मुलगा कृष्णा (वय 16) आणि कैवल्य (वय 7) असे चौघांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर असे की, डॉ. महेंद्र थोरात यांनी त्यांच्या राहत्या घरी पत्नी वर्षा व मुले कृष्णा आणि कैवल्य यांना अगोदर इंजेक्शनच्या सहाय्याने मारले. त्यानंतर त्यांनी स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी पहाटेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला एक चिट्ठी लिहून चिकटवण्यात आली आहे. ‘माझा मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णालाही मन लागत नाही, हे वडील व आई म्हणून दु:ख सहन करून शकत नाही. म्हणून मी व माझी पत्नी वर्षा चर्चा करून विचाराने हे आत्महत्येसारखे कृत्य करत आहे. हे योग्य नसले तरी नाईलाजास्तव हे कृत्य करत आहे. यात कोणालाही जबाबदार धरू नये’ असा मजकूर या चिठ्ठीत होता. माझ्या संपत्तीचा काही भाग कर्णबधीर मुलांसाठी काम करणार्‍या सेवासंस्थेसाठी द्यावा, असेही त्यात म्हटले आहे.  

राशिनसह परिसरात ही घटना समजताच त्यांच्या श्रीराम हॉस्पीटलमोर मोठी गर्दी झाली. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी आत्महत्या की घातपात याबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून दुपारी उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कर्जत पोलिस ठाण्यात सुरू होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या