Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवाजी महाराजांनी संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले - महेश तवले


 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर - छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणार्‍यांचा चोख बंदोबस्त केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले, शक्ती पेक्षा युक्तीने कार्य केले. संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपणही समाजात काम केले पाहिजे. समाजातील दुर्लक्षित दुर्बल घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करावे. युवकांनी आपल्या शक्तीचा उपयोग समाजाच्या उन्नत्तीसाठी करावा, असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष  महेश तवले यांनी केले.

       छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले यांच्यावतीने संत नामदेव चौक येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.  यावेळी उद्योजक अनिकेत चेमटे, संपतराव नलावडे, विशाल नाकाडे, रवी  गुडा, भाजपा सरचिटणीस तुषार पोटे, नगरसेवक रामदास आंधळे, उद्योजक सुजित डोके आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी बालकांनी बाल शिवाजीची वेषभुषा केली होती. चौकात सुशोभिकरण करण्यात आले होते. यावेळी रमेश माने, नंदकुमार जगताप, संदीप कर्डिले, अविनाश निक्रड, कुलदीप खेसे, संदीप तवले, गणेश उभेदळ, सुभाष वाघ, प्रमोद मचे, राजू अनमल, संजय सानप, राम कर्डिले, विवेक तवले, गणेश बांगर, शुभम पांडूळे, अजय आव्हाड, तुषार शिंदे, कैलास बाबर, अमोल सोनार, आशिष आव्हाड, मयूर वांढेकर, प्रविण टिमकरे, रोहित आजबे, राहुल पोकळे, शनी जाधव, श्याम शिंदे, विवेक तांबे, परेश राऊत, डॉ.संतोष लोखंडे, कृष्णा एडके, संकेत विधाते, महेश आंधळे, गिरीष तवले, सौरभ काळे, सुरज घुमरे, आदेश कर्डीले, अजिंक्य पालवे, आदित्य जावळे, गौरव गडाख, संदीप घोडके, नारायण काकडे, संदीप काकडे, साईनाथ शिंदे, बबलू कराळे, ऋतिक जगताप, किरण गांगर्डे, कार्तिक तवले, सोनू तवले, वैभव कजबे, नवनाथ गवळी, चेतन आजबे, तांदळे मामा, नामदेव शिंदे, विशाल कोरडे, विष्णू तवले, साहिल शेख आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या