Ticker

6/Breaking/ticker-posts

कॉ.पानसरे समाज व्यवस्थेचे अविभाज्य घटक होते - उत्तम कांबळे








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर : - इतिहास समजावून कसा घ्यायचा,वर्तमानाशी तो कसा जुळवायचा आणि भविष्यात इतिहासाचा कंदील घेऊन कसे चालायचे हे कॉ.गोविंद पानसरे सांगायचे,कॉ.पानसरे म्हणजे आपल्या समाज व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग होते.असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत, पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.

        शब्दगंध साहित्यिक परिषद आयोजित कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार  वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

जुन्या पिढीतील कम्युनिस्ट चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते कॉ.का.वा.शिरसाठ यांना शब्दगंधच्या वतीने यावर्षीचा कॉ.गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष अरुण कडू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास विचारपिठावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव ऍड कॉ.सुभाष लांडे,भारतीय महिला फेडरेशन च्या राज्य अध्यक्ष प्रा.स्मिता पानसरे,कॉ.बाबा आरगडे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी,खजिनदार भगवान राऊत यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उत्तम कांबळे म्हणाले कि, शब्दगंधने या पुरस्कार वितरण कार्यक्रमात सातत्य ठेवले ही अभिमानास्पद बाब आहे,कॉ.गोविंद पानसरे यांचे विचार आजही आम्हाला लढण्याची प्रेरणा देतात,देह संपतात मात्र विचार कायम राहातात,कॉ.पानसरे,डॉ. दाभोलकर व प्रा.कलबुर्गी यांच्या हत्या म्हणजे येथल्या व्यवस्थेने जाणीवपूर्वक रचलेला पूर्वनियोजित कट होता.हे आता लपून राहिलेलं नाही.इथली व्यवस्था विचारांना आणि विचार करणाऱ्या माणसांना खुप घाबरते,ज्यांना ही माणसे आपल्या वाटेतील अडसर वाटतात ती व्यवस्था अश्या विचारी माणसांना संपवते.मात्र विचार कधीच संपू शकत नाहीत,माणसाची स्वप्ने संपवू शकणारी कोणतीही यंत्रणा या जगात अस्तित्वात नाही.

        अध्यक्षपदावरून बोलताना अरुण कडू म्हणाले कि,कॉ.गोविंद पानसरे यांच्या नावाने शब्दगंध च्या वतीने दिला जाणारा पुरस्कार पाथर्डी तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते कॉ.का.वा. शिरसाठ याना मिळाला,ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंददायी अशी बाब आहे,शिरसाठ यांच्या भावी वाटचालीस मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो,यावेळी प्रा.स्मिता पानसरे,ऍड सुभाष लांडे पाटील यांची भाषणे झाली.सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले,शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले तर भारत गाडेकर यांनी आभार मानले.

कॉ गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.या कार्यक्रमास निवासी जिल्हाधिकारी संदीप निश्चित, प्राचार्य शिवाजीराव देवढे,इंजि.अर्षद शेख,चंद्रकांत पालवे,प्रा.डॉ.मेहबुब सय्यद,युंनुस तांबटकर,श्रीधर अंभोरे,पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती,ऍड बंशी सातपुते,दशरथ खोसे,भारती न्यायपल्ली,संध्या मेढे,ऍड सुधीर टोकेकर इ मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजयकुमार पवार,सुभाष सोनवणे,वसंत डबाळे,तुकाराम गोंदकर,डॉ. अनिल गर्जे यांनी विशेष परिश्रम घेतले.

    कोविड प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून अवघ्या चाळीस निमंत्रितांच्या उपस्थित हा कार्यक्रम घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या