Ticker

6/Breaking/ticker-posts

सदाआण्णाच्या निधनाने मोठी पोकळी ; उणीव भासू देणार नाही- आ.पाचपुते

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क

काष्टी :- माझ्या राजकीय जीवनात धाकटा लक्ष्मणरुपी भाऊ माझ्या पाठिमागे खंभीरपणे उभा असल्याने अडचण भासली नाही.परंतु  सदाआण्णाच्या जाण्याने तालुक्यात मोठी पोकळी निर्माण झाली ती भविष्यकाळात आमचे संपूर्ण  कुटुंब भरुण काढतील असा विश्वास आमदार बबनराव पाचपुते यांनी बोलून दाखविला.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील साईकृपा उद्योग समुहाचे अध्यक्ष  जिल्हा परिषद सदस्य सदाशिव अण्णा पाचपुते यांचे दि.१९ रोजी दुःख  निधन झाल्याने आज दि.२८ रोजी सदाअण्णा यांचा दशक्रिया विधी पार पडला. त्यावेळी खासदार सुजय विखेपाटील,माजी आमदार शिवाजीरा कर्डिले,व माजी आमदार भिमराव धोंडे, यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचात,सहकारी संस्था,पतसंस्था,पंचायत समिती जिल्हा  परिषद, पोलिस,महसुल,सार्वजनिक बांधकाम.वन,व आदिवासी विभागातील आजी माजी पदाधिकारी मोठ्या सख्येने उपस्थित होते.

 कै.   अण्णाच्या पिंडाला  काकस्पर्श झाल्यानंतर दशक्रिया विधीला आलेल्या जनसमुदायासमोर रुणव्यक्त करताना बंधू आ.पाचपुते बोलताना म्हणाले अण्णाच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर झालेले दुःख खुप मोठे आहे.ते कधी भरुण येणारे नाही.याची मला जानिव आहे.परंतु  तुमच्या  सर्वाच्या सांत्वन भेटीने आम्हांला  आधार मिळाला झालेल्या दुःखातून सावरण्यासाठी  परमेश्वर शक्ती देईल.आपण आमच्या दुःखात सहभागी होवू गेली दहा दिवस भेटी देवून सांत्वन केले. दहा दिवस चुल पेटून दिली नाही. वेगवेगळ्या समाजातील   प्रत्येक  कुटुंबातून दररोज जेवन आले.आठ दिवस प्रत्येक गावातील भजनी मंडळीनी येवून आकडा व भजन केले.

 तुमचे आमच्या कुटुःबावर असणारे प्रेम यातून उतराई आमच्या कडून होवू शकत नाही. हे आमच्या  कायम लक्षात राहिल अण्णाच्या जाण्यामुळे तालुक्यातील सामान्य जनता व कार्यकर्ते यांना वाऱ्यावर सोडणार नाही.समोर कोरोनाचे मोठे संकट असल्याने  भेटीत अडचणी येतात. माझ्या घरात आणखी  चार पेंशट आहेत.  परंतु यातून आम्ही सावरू आणि  काही दिवसात आम्ही सर्व कुटुंब एकत्र येवून पुन्हा तुमच्या  कामात सभागी होवू असा विश्वास देत आ.पाचपुतेच्या आश्रुचा बांध फुटला शेवटी शेवटी कुटुंबातील सदस्य  विक्रमसिंह,सुदर्शन,साजन,प्रतापसिंह पाचपुते यांनी हात जोडून रुण व्यक्त  केले. संदिप नागवडे,व दत्ता पाचपुते यांनी प्रस्तावना केली. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या