Ticker

6/Breaking/ticker-posts

टाकळी ढोकेश्वरच्या ग्रामपंचायतीवर,आमदार निलेश लंके यांचा झेंडा,विखे गटाला सत्तेपासून रोखले..!

  


टाकळी
ग्रामपंचायत: सरपंचपदी अरूणा खिलारी   तर उपसरपंचपदी  सुनिल चव्हाण

  





लोकनेता न्यूज

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

टाकळी ढोकेश्वर :-पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण गावात आमदार निलेश लंके यांचे विश्वासू बाळासाहेब खिलारी यांच्या पत्नी सौ.अरूणा प्रदिप उर्फ बाळासाहेब खिलारी यांची सरपंचपदी तर माजी .नंदकुमार झावरे यांचे विश्वासू  सुनिल हरिभाऊ चव्हाण यांची उपसरपंचपदी निवड झाली.

टाकळी ढोकेश्वर(ता.पारनेर)येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी सौ.अरूणा प्रदिप खिलारी पुजा नविन झावरे यांनी सरपंच पदासाठी तर सुनिल हरिभाऊ चव्हाण किशोर शिवाजी गायकवाड यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज भरले होते.अखेर दोन वाजता सरपंच उपसरपंचपदासाठी चिठ्ठी व्दारे मतदान निवडणूक होवून यामध्ये सौ.अरूणा प्रदिप खिलारी यांना १५ पैकी तर पुजा नविन झावरे यांना १५ पैकी मते मिळाली आहे.तर उपसरपंच साठी सुनिल हरिभाऊ चव्हाण यांना १५ पैकी तर किशोर शिवाजी गायकवाड यांना १५ पैकी मते मिळाली आहेत

तथापी जेष्ठ नेते सिताराम खिलारी यांच्या पॅनलला १० तर विरोधी जनसेवा पॅनलला जागा मिळाल्या होत्या.मात्र जिल्हा बँकेमध्ये महाविकास आघाडीचा झाल्यामुळे तोच फार्मुला ग्रामपंचायत निवडणूकीत राबविला गेल्याने महाविकास आघाडीमध्ये ढोकेश्वर ग्रामविकास पँनेलचे दत्ता निवडुंगे,प्रियंका सोमनाथ बांडे,अरुणा प्रदीप खिलारी,सुग्राबी कादर हावलदार हे चार जनसेवा पँनेलचे रामदास किसन तराळ,शुभम सुनील गोरडे,सुनिता जयसिंग झावरे, गंगाधर बाळू निवडुंगे,सुनील हरिभाऊ चव्हाण हे पाच एकत्र येत महाविकास आघाडी करत ढोकेश्वर पँनेलचे शिवाजी सिताराम खिलारी,पूजा नवीन झावरेअर्चना बापूसाहेब रांधवन,किशोर शिवाजी गायकवाड, सुमन दीपक साळवेकमल भाऊसाहेब खिलारी असे सहा जणांना भाजप खासदार डाँ.सुजय विखे गटाला सत्तेपासून रोखण्यात महाविकास आघाडीला यश आले.

.निलेश लंकेची सावध भूमिका तर अशोक कटारिया ठरले किंगमेकर ....! 

 १५ जागांपैकी जेष्ठ नेते सिताराम खिलारी यांच्या ढोकेश्वर ग्रामविकास पॅनलला १० तर अशोक कटारिया यांच्या जनसेवा पॅनलला जागा मिळाल्या होत्या मात्र अशोक कटारिया यांनी महाविकास आघाडी करत आमदार निलेश लंके यांना बरोबर घेवून १५ पैकी जागांवर वर्चस्व सिध्द करत सरपंच पदी आमदार निलेश लंके यांचे विश्वासू बाळासाहेब खिलारी यांच्या पत्नी सौ.अरूणा खिलारी तर माजी आमदार नंदकुमार झावरे यांचे विश्वासू सुनिल चव्हाण यांना उपसरपंच पदी विराजमान केले.



 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या