Ticker

6/Breaking/ticker-posts

“ ‘गंगा’.. तेरा ‘राम’ अब , नही रहा..!” राजीव कपूर यांचं निधन




ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेता,

निर्माता,दिग्दर्शक

 राजीव कपूर यांचं मुंबईत निधन



लोकनेता न्यूज

 ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई- ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणधीर कपूर यांनी भावाला तातडीने जवळच्या इस्पितळात भरती केलं, पण उपचारांपूर्वीच राजीव कपूर यांचं निधन झालं होतं.

रणधीर यांनी राजीव यांचं निधन झाल्याचं सांगितलं. भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, 'आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. पुढील सर्व कामांसाठी आता मी इस्पितळातच आहे.'राजीव कपूर हे विशेषतः 'राम तेरी गंगा मैली' (१९८५) आणि 'एक जान हैं हम' (१९८३) मधील अभिनयासाठी प्रसिध्द आहेत. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'प्रेमग्रंथ' सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. नितू कपूर यांनी राजीव कपूर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं.

राजीव कपूर अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक होते. राजीव कपूर यांनी 'एक जान हैं हम' या चित्रपटातून 1983  साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटात ते मुख्य भूमीकेत दिसून आले होते. या शिवाय त्यांनी आसमान (1984), लवर बॉय (1985), जबरदस्त (1985) और हम तो चले परदेस (1988) चित्रपटात काम केले आहे. राजीव कपूर यांनी आ अब लौट चलें (1999), प्रेमग्रंथ (1996) और Henna (1991) या चित्रपटाचे निर्माते होते.   प्रेमग्रंथ  या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.

राजीव यांच्या आयुष्यातील फारशा माहीत नसलेल्या गोष्टी
* राज कपूर यांचा सर्वात लहान मुलगा राजीव कपूर यांचा जन्म २५ ऑगस्ट १९६२ मध्ये मुंबईत झाला. त्यांना चिंपू नावाने घरात हाक मारायचे.
* १९८३ मध्ये 'एक जान हैं हम' या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

* १९८५ मधील 'राम तेरी गंगा मैली' या सिनेमाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली.
* अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्माते म्हणूनही काम पाहिलं. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'प्रेमग्रंथ' सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं. 'आ अब लौट चले' सिनेमाची निर्मिती त्यांनी केली.* सिनेकरिअर फारसं न चालल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी आर्किटेक्ट आरती सब्बरवाल यांच्याशी लग्न केलं.
* हे लग्न फारसं चाललं नाही. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला.
* यानंतर राजीव यांनी दुसरं लग्न केलं नाही. ते मोठे भाऊ रणधीर कपूर यांच्यासोबतच राहू लागले. राजीव यांना मुलं नाहीत.
* राजीव यांच्या पश्चात त्यांचा मोठा भाऊ रणधीर कपूर आणि त्यांचं कुटुंबिय तसेच बहीण रिमा जैन आणि त्यांचं कुटुंब आहे. राजीव यांना कुटुंबासोबत जेवायला प्रचंड आवडायचं.* एक अभिनेता म्हणून १९९० मध्ये त्यांनी 'झिम्मेदार' या सिनेमात अखेरचं काम केलं.
* राजीव कपूर यांना मेरा नाम जोकर हा सिनेमा इतका आवडायचा की, त्यांनी हा सिनेमा १५० हून जास्त वेळा पाहिला होता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या