Ticker

6/Breaking/ticker-posts

आ. रोहितदादांचे वडिलांचा असाही साधेपणा ..


 

लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

  कर्जत:-आमदार रोहित पवार यांचे वडील  व बारामती अँग्रोचे सर्वेसर्वा  असलेले राजेंद्र पवार हे नुकतेच कर्जत येथे एका कार्यक्रमासाठी आले असता व्यासपीठावर न बसता समोर खुर्ची वर नागरीकांमध्ये बसले होते, त्यांना व्यासपिठावर गृहमंत्री यांनी बोलावल पण ते खाली बसले यावरून  त्यांच्या मनाचा मोठेपणा, विनम्रता यावर आणि साधेपणावर तालुकाभर  जोरदार चर्चा झडत आहे .

कर्जत येथे काल पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नव्याने बांधन्यात येत असलेल्या वसाहतीचे भूमिपूजन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते झाले. आमदार रोहित पवार पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलिस अधिक्षक सौरव आगरवाल,काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, उपजिल्हाध्यक्ष प्रवीण घुलेसभापती अश्विनी कानगुडे, राजेंद्र  गुंड ,गृहनिर्माणच्या दीपाली भाईक बळीराम यादव, दीपक शहाणे, किरण पाटील काकासाहेब तापकीर पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव,बापूसाहेब नेटके, नानासाहेब निकत ,अशोक जयभाय, डॉक्टर शबनम इनामदार विशाल मेहेत्रे, मनीषा सोन माळी, सतीश पाटील राजश्री तनपुरे, रज्जाक झारेकरी आदी उपस्थित होते. 

यावेळी आ. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार हेही या कार्यक्रमास उपस्थित होते.  त्यांना या मान्यवारांनी व्यासपीठावर येण्याची विनंती केली , परंतु त्यास नकार देत ते श्रो त्यांमध्येच बसून राहिले. राजेंद्र पवार हे बारामती अँग्रोचे जनक असून शेती संशोधक आणि अभ्यासक आहेत.नगर जिल्ह्यात ते प्रथमच आले होते. त्यांनी व्यासपीठाचे खालीच थांबून संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला . वास्तविक एवढा मोठा माणूस असूनही कोणताही अहंभाव त्यांचेजवळ नाही. अत्यंत साधी राहणी अन सरळ मार्गी विचारसारणी याचं सर्वांनाच अप्रूप वाटल. त्यांच्या या साधेपणाची सर्वत्र चर्चा झडत आहे.     

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या