Ticker

6/Breaking/ticker-posts

मूत्रपिंड विकार अडलेल्या शिक्षकांचा विशेष संवर्ग १ मध्ये समावेश : आ. लंके यांच्या पाठपुराव्यास यश

 लोकनेता न्यूज 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क

पारनेर : मूत्रपिंडाचे विकार असलेल्या प्राथमिक शिक्षक किंवा त्याच्या जोडीदाराचा विशेष संवर्ग १ मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांच्याकडे  आमदार निलेश लंके यांनी केली होती. मंत्री मुश्रीफ यांनी यांनी संवर्ग १ मध्ये अशा शिक्षकांचा समावेश करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.  गेल्या अनेक वर्षापासून विविध प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येत होती. आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून या मागणीला यश मिळाले आहे.

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीच्या सुधारित धोरणामध्ये जन्मापासुन एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले शिक्षक व त्यांचे जोडीदार यांचा विशेष संवर्ग १ मध्ये समावेश करावा असे निवेदन दिले होते.वरील विषयान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या १५ मे २०१४ , २७ फेब्रुवारी २०१७ २८ मे २०१९ च्या शासननिर्णया नुसार जन्मापासुन एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले शिक्षक व त्यांचे जोडीदार यांना बदली प्रक्रियेत प्राधान्य देऊन त्यांचा समावेश विशेष संवर्ग १ मध्ये केला आहे.त्यामुळे यासंबंधी अनेक प्राथमिक शिक्षकांच्या तक्रारी लेखी स्वरुपात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांच्याकडे प्राप्त पण झाल्या होत्या व त्याची मागणी पण करण्यात आली होती.त्यानुसार  जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीच्या सुधारित धोरणामध्ये जन्मापासुन एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले शिक्षक व त्यांचे जोडीदार यांचा विशेष संवर्ग १ मध्ये समावेश करण्यात आल्याबद्दल विविध प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने आमदार निलेश लंके यांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या