Ticker

6/Breaking/ticker-posts

भगवान जिव्हेश्वर जन्मोत्सव आज कोविडमुळे घरीच होणार साजरा

  


   लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अहमदनगर- साळी समाजाचे आद्य पुरुष व  पृथ्वीवर पहिला हातमाग चालून वस्त्र निर्माण करणारे भगवान जिव्हेश्वर यांचा प्रकटदिन आज कोविडच्या प्रादुर्भावामुळे,शासकीय नियमानुसार मंदिरात साध्या पद्धतीने व समाज बांधव घरोघरी साजरा करत असल्याची   माहिती जिल्हा साळी  समाजाचे संघटक व जागतिक साळी फाऊंडेशनचे जिल्हा संपर्कप्रमुख  महेश कांबळे यांची दिली.

 २० ऑगस्ट रोजी आहे  हा सोहळा  भारतभर मोठ्या उत्साहात साजरी होत असतो  तर नगरजिल्हात , कोपरगाव, श्रीरामपूर ,संगमनेर , शेवगाव आदी तालुक्यासह  नगर शहर मधील बागडपट्टी , सावेडी,दिलीगेट यथील मंदिरात   साजरा होत असतो .त्यानिमित्ताने   विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते मात्र आज हा जन्मोत्सव कोविडमुळे घरोघरीच साजरा होत आहे.

 सांगली, कोल्हापूर , रत्नागिरी , कोकण येथील महापुरामुळे   समाज बांधवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे , उत्सवानिमित्त सर्व समाजबांधवांनी आपापल्या ठिकाणी पूरग्रस्त मदत निधी समाजाच्या मंदिरात किंवा किंवा वेगवेगळ्या संस्थांकडे जमा करावा तो पूरग्रस्तांना अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संघटनेच्या  माध्यमातून दिला जाणार आहे असे आवाहन सर्व समाजाच्या संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे , प्रत्येकाने घरी भगवान जिव्हेश्वराचे प्रतिमा पूजन करून आरती करावी.

साळी  समाजाचे कुलदैवत भगवान जिव्हेश्वर याच्या विषयी माहिती देताना ते म्हणाले   भगवान जिव्हेश्वरांचे संक्षिप्त चरित्र मध्ये आद्य वस्त्र निर्माता भगवान जीवेश्वर आहे हे आपल्याला समजते आदिमायेकडून सॄष्टीची रचना झाली. तिच्या सत्व, रज, तम या त्रिगुणांपासून ब्रम्हा, विष्णू, महेशाची उत्पत्ती झाली. ब्रम्हाने ब्रम्हांडाची रचना करून, पंचमहाभूतांना निर्मून, देव, दानव, मानव व विभिन्न जीवकोटिंना जन्म दिला पण देव, दानव व मानव इतर प्राण्यासारखे नग्नावस्थेतच आहेत त्यांच्या लज्जा रक्षणार्थ वस्त्राची निर्मिती झाली पाहिजे' तेव्हा महादेवांनी आदिमायेचे स्मरण केले.तिने प्रत्यक्ष होऊन श्रीशंकरास म्हटले, `परमेश्वरा, वस्त्र निर्मिणार्‍या पुरूषाची आपण उत्पत्ती करा.'

महादेवाने आपल्या जिव्हेच्या अग्रभागातून कोटी सूर्याच्या प्रकाशाने युक्त अशा एका दिव्य शिशूस उत्पन्न केले.सारा कैलास आनंदविभोर झाला. आनंद प्रदर्शक मंजुळ घंटानाद होऊ लागला. श्रावण शुद्ध त्रयोदशी सोमवार हा तो दिवस होता. या शुभदिनी कैलासातील सार्‍या सुवासिनींनी नवजात अर्भकास पाळण्यात घालून त्याचे नामकरण केले. श्री शंकराच्या जिव्हेतून उद्भवल्यामूळे `जिव्हेश्वर' त्रिगुणात्मांना साहाय्य कर्ता म्हणून `स्वकुळ' व सुर्योदय समयी जन्मला म्हणून `सुर्यवंशी' अशा प्रकारे बालकाचे नामकरण झाले. सार्‍या जगाला वस्त्रप्रावरणांचा पुरवठा करून मनवांच्या लज्जेचे आणि मानाचे रक्षण करो असा आशीर्वाद बालकास दिले

या साळी   शब्दाचा उत्पत्तीच्या दॄष्टीने अर्थ तो असा: शाल वॄक्षाची साल साळ्णारे ते साळी, किंवा शाली. ही प्रागैतिहासिक काळातील, समाज हा अर्धनग्न व वन्य अवस्थेत असतानाची घट्ना आहे. मानव वनचर असताना वस्त्रे म्हणून या सालीचाच उपयोग करीत होता. रामायण काळात राम, सीता व लक्ष्मणाने वनवासात जाताना याच सालीची वस्त्रे धारण केली होती. त्यास वल्कले म्हणत. वस्त्रे विणण्याची कला मानवास, साध्य झाल्यानंतर या साल साळणार्‍या साळ्यांनी स्वीकारली व ते साळी या नावानेच समाजात परिचित राहिले. 

                  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या