Ticker

6/Breaking/ticker-posts

बैल गेला अन् झोपा केला ... कांद्यावरीलनिर्यातबंदी उठविली.!

 

नाशिक : भारताने कांद्याची निर्यातबंदी उठविली मात्र, परदेशातील कांद्याचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे निर्यातबंदी उठल्याने खूप हुरळून जाण्यासारखी स्थिती राहिली नाही. कांद्याच्या दरात खूप मोठा फरक पडणार नाही. फार फार तर तिनशे ते चारशे रुपयांनी दर वाढतील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीसाठी आणल्यास, त्यांना वाढीव दराचा फायदा होऊ शकतो, असाही अंदाज वर्तविला जात आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठविल्याने स्थानिक बाजारांमध्ये गेल्या आठवडयापासून कांद्याच्या भावात थोडी-फार सुधारणा होऊन भाव वाढले आहेत. मात्र, ते आणखी वाढतील की नाही, याची खात्री देता येत नाही. कारण भारताची निर्यात खुली झाल्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराणमधील कांद्याचे दर कमी झाले आहेत, शिवाय तेथे कांदा पुरेसा उपलब्ध आहे.

वास्तविक केंद्र सरकारने निर्यातबंदीच करण्याची गरज नव्हती , राजकीय सोईसाठी असे निर्णय होतात . कमीत कमी ही निर्यातबंदी २ महिन्यापूर्वी तरी उठवायला हवी होती . शेतकऱ्यांना त्याचा काही तरी फायदा झाला असता . आता घेतलेला हा निर्णय म्हणजे बैल गेला अन् झोपा केला अशा प्रकारात मोडतो ., अशी संतप्त भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या