Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यातील सर्व रुग्णालयातील शिशु केअरचे तात्काळ ऑडिट करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

 

मुंबई :  :- जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु: व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

भंडाऱ्यातील दुर्घटनात अतिशय दुर्दैवी असून दुःख भरुन निघणारं नाही.  संदर्भात सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई केली जाणार आहे, असे राज्याचे वनमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे .

आगीची घटना घडली त्या शिशु केअर युनिटमच्या वीज प्रवाहात गेल्या सात दिवसांपासून समस्या होती. वीजपुरवठा कमी जास्त होत होता. त्याकडे लक्ष दिले नाही. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचं इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं नाही. मे 2020 पासून तर तीन वेळा रुग्णालयाने इलेक्ट्रिक ऑडिट करा असे पत्र दिले होते, मात्र, तरीही ऑडिट केलं नाही, असा गंभीर आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख आज दुपारी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देणार

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग लागून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. सदर घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी भंडारा पोलिसांना दिले आहेत. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख घटनास्थळी भेट देणार आहेत.

आपण मौल्यवान जीव गमावले- पंतप्रधान

  "भंडाऱ्यातील दुर्घटना हृदय पिळवटणारी आहे. आपण मौल्यवान जीव गमावले आहेत. पीडितांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत. दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो," असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

दुर्घटनेबद्दल राज्यपालांकडून दु: व्यक्त

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर यूनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल तीव्र दु: व्यक्त केले आहे. भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीच्या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजून तीव्र दु: झाले. घटनेत प्राण गमावलेल्या निष्पाप बालकांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

ही हत्या, महाराष्ट्र सरकार जबाबदार : राम कदम

भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये 10 निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू हा प्रशासनच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. ही हत्या आहे. त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे, अशी टीका भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या