Ticker

6/Breaking/ticker-posts

पेट्रोल, डिझेल.घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी कांग्रेसच्या वतीने निदर्शने

 

अहमदनगर :- पेट्रोल, डिझेल घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात सर्वसामान्य जनता होरपळून निघत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र करून पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोलच्या मशीनला चपलांचा हार घालून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

पुढे बोलताना .संग्राम जगताप म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल घरगुती गॅस सिलेंडर यावर दरवाढी विरोधात सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसला आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निम्म्यापेक्षा कमी झाल्या असताना पेट्रोलचे भाव निम्म्यावर येणे अपेक्षित होते, परंतु केंद्र सरकारने यावर 50 टक्के पेक्षा अधिक कर लावून स्वस्त झालेल्या पेट्रोल डिझेलचा भाव देशातील जनतेला मिळवून दिला नाही. आज कच्चा तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात थोडीफार वाढ झालेली असताना देशात यावर लावलेल्या प्रचंड कर कमी करून पेट्रोल डिझेल घरगुती गॅस याच्या किमती नियंत्रणात आणण हे शासनाचे कर्तव्य होते. याशिवाय स्वयंपाक घरातील गॅस सिलिंडरच्या किमती 400 रुपये वरून 800 रुपये पर्यंत वाढ झालेली असून सर्वसामान्य गृहिणीचे बजेट कोलमडले आहे . या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. 

यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभिजित खोसे म्हणाले की पेट्रोल-डिझेल घरगुती गॅस याने उच्चांक गाठला आहे इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे त्यामुळे गोरगरीब जनतेला आर्थिक झळ बसून ते त्रस्त झाले आहेत सर्व स्तरावर महागाई वाढलेली असून सर्वसामान्य जनतेला जगणे कठीण झाले आहे . सर्वसामान्यांना चांगले दिवस दाखवण्यासाठी पेट्रोल-डिझेल घरगुती गॅस सिलेंडर वरील लावलेले विविध कर त्वरित मागे घेऊन त्याच्या किमती कमी करण्यात यावे असे म्हणाले.

यावेळी . संग्राम जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित खोसे, महिला अध्यक्षा रेशमा आठरे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे, विद्यार्थी अध्यक्ष गजानन भांडवलकर, वैभव ढाकणे, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, साधनाताई बोरुडे, नगरसेवक समद खान, अमोल गाडे, प्रकाश भागानगरे, अजिंक्य बोरकर, विनीत पाऊलबुद्धे, सुनील त्रिंबके, आरिफ शेख, भिंगार युवक शहर संघटक मतीन सय्यद, गजेंद्र दांगट, विपुल वाखुरे, सैफअली शेख, विक्रांत दिघे, चेतन सपकाळ, किरण पंधाडे, अमित जाधव, सोमा तांबे, विशाल शिंदे, नितीन लिगडे, ऋषिकेश ताठे, रुपेश चोपडा, सुदर्शन ढवळे, आयाज सय्यद, अभिजीत खरपुडे, तनवीर मनियार, राजेश भालेराव, संभाजी पवार, रोहन शिरसाट, पंकज भंडारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या