Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव कांदा मार्केटचे लिलाव शेतकऱ्यांने बंद पाडले.

 

शेतकऱ्यांत संताप

 शेवगाव:-    लिलावात काद्यांला कमी भाव मिळाल्याने शेवगाव कांदा मार्केटचे लिलाव शेतकऱ्यांने बंद पाडले होते. भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे बाजार समितीचे सभापती अॅड.अनिल मडके यांनी दर वाढवण्याचे मध्यस्थीने पुन्हा लिलाव सुरू झाले.

       शेवगाव बाजार समितीच्या आवारात सोमवारी नेहमीप्रमाणे कांद्याची मोठी आवक झाली होती. शेवगाव, पाथर्डी, नेवासा,कडा,आष्टी,धामनगाव आदी ठिकाणाहून शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी आला होता. दुपारी १२ वाजता कांदा लिलाव सुरू झाला असता व्यापाऱ्यांनी एक नंबर कांद्याचा हजार ३०० ते हजार ६०० रुपये असा कमी दराने लिलाव सुरु केला. तर दोन तीन नंबर कांद्याला भावाची गळती लावली, इतर ठिकाणी झालेला लिलाव पाहता हे दर परवडणारे असल्याने शेतकऱ्यांत संताप निर्मान झाला आणी त्यांणी सदर लिलाव बंद पाडले.
     
याबाबत काही शेतकऱ्यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याशी संपर्क साधला, घुले यांनी फोनवर भाववाढुन देण्याबाबत व्यापाऱ्यांना तंबी दिली तर मुंडे यांनी तातडीणे कांदा मार्केटला भेट देऊण शेतकऱ्यांशी संवाद साधला व्यापाऱ्यांशी भाववाढ देण्याबाबत चर्चा केली. समितीचे सभापती अॅड.अनिल मडके, सचिव अविनाश म्हस्के यांनीही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊण व्यापाऱ्यांना भाववाढीच्या सुचना दिल्याने लिलाव पुर्ववत सुरू झाले.
        
फेरलिलावात एक नंबर कांद्याचा हजार ते हजार २०० दोन नंबर कांद्याला हजार ६०० ते हजार ९०० तर तीन नंबरला हजार २०० असा लिलाव झाला.या दिवशी हजार कांदा गोण्यांची आवक झाली होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या