Ticker

6/Breaking/ticker-posts

गुड न्यूज ! 'विरुष्का'च्या घरी नव्या पाहुणीचं आगमन

 


नव्या पाहुणीचं आगमन

मुंबई :-  टीम  इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे. विराट कोहलीने स्वत: सोशल मीडियावर याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. विराट कोहलीने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली होती.

विराटनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत. आमचं सौभाग्य आहे की जीवनाचा हा चॅप्टर आम्हाला अनुभवता आला. आता आम्हाला थोडी प्रायव्हसीची गरज आहे, असं विराटनं म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या