Ticker

6/Breaking/ticker-posts

नरेंद्र फिरोदिया ‘मेन ऑफ दी इअर’

 

लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

 नगरः मागील वर्षभरात सामाजिक क्षेत्रासह वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांना टाईम्स मेन ऑफ दी इअरपुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नरेंद्र फिरोदिया यांना फिलांथ्रोपिस्ट अर्थात समाज कल्याणकारी उपक्रमांसाठी या पुरस्काराने गौरविण्यात आले. राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, मनोरंजन आदी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍यांना टाईम्सने हा पुरस्कार देते. यावर्षी गीतकार जावेद अख्तर, अभिनेता कुणाल कोहली, अभिनेता स्वप्नील जोशी यांच्यासह नरेंद्र फिरोदिया यांना हा पुरस्कार मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत नरेंद्र फिरोदिया हेच या पुरस्काराने मानकरी ठरले आहेत.    

नरेंद्र फिरोदिया यांनी सक्षम भारत या ध्येयाने विविध क्षेत्रात वाटचाल करत आहेत. त्यातून ते नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देतात. आय लव्ह नगर या सामाजिक व्यासपीठ त्यातून उभे राहिले आहे. नगरकरांसाठी हे व्यासपीठ त्यांच्या हक्काचे ठरले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून त्यांनी वर्षभरात विविध सामाजिक उपक्रमांना बळ दिले आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन झाला. या काळात त्यांनी सामाजिक दायित्व म्हणून आय लव्ह नगर या व्यासपीठाच्या माध्यमातून मोठे कार्य उभारले. नगर शहरासह जिल्ह्यातील पाच हजार पेक्षा अधिक गरजूंना किराणा किटचे वाटप केले. लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर भटकत असलेल्या आष्टी (जि. बीड) येथील ऊसतोड मजुर दाम्पत्याला त्यांच्या भाजलेल्या बाळावर उपचार करून दिले. यामुळे बाळाला जीवनदान मिळाले. कोरोना रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात, पोलीस मुख्यालयात, खाजगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध करून दिले. 

            आय लव्ह नगरच्या माध्यमातून महिलांसाठी कोविड सेंटर उभारले. रोटरीने उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये देखील पुढाकार घेतला. याशिवाय आय लव्ह नगरच्या माध्यमातून शहर विकासावर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विविध उपक्रमात नेहमीच सहभाग असतो. सामाजिक क्षेत्रात काम  करणार्‍या संघटनांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना सतत सहभाग असतो. पर्यटन, क्रीडा, शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट, लघू-मध्यम उद्योजकांना नरेंद्र फिरोदियांकडून नेहमीच भक्कम पाठबळ आहे. 

            देशभक्ती, स्वातंत्र्य चळवळ वारसा लाभलेल्या नरेंद्र फिरोदिया यांनी डिजिटल माध्यम क्षेत्रात देखील राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविला आहे. लेटस्अप’, ‘लेटस्फिक्सया डिजिटल माध्यमांद्वारे रोजगार निर्मिती केली. डिजिटल माध्यमे आचारसंहिता नसते, असे म्हटले जाते. परंतु नरेंद्र फिरोदिया यांनी या माध्यमांद्वारे देशासह आतंरराष्ट्रीय पातळीवर माहितीचे जाळे उभारलेे. हे करताना त्यांनी एक आदर्श आचारसंहिता घालून दिली. त्याचे माध्यमांमध्ये देखील कौतुक होते. याशिवाय टेलिकॉम, रिअल इस्टेट, करमणूक, वाहन उद्योग अशा क्षेत्रात देखील ते कार्यरत आहेत. या सर्व क्षेत्रातून शेकडो जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या सर्व क्षेत्रातील चौफेर कामगिरीची दखल टाईम्स ऑफ इंडिया प्रकाशनाने नरेंद्र फिरोदिया यांना सामाजिक उपयोगी कामासाठी टाईम्स मेन ऑफ दी इअरया पुरस्काराने सन्मानित केले. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या