Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसेना विरुद्ध अण्णा 'सामना' रंगला..

 

 

 मंत्र्यांना घरी बसावे लागले हे विसरलात काय ?


लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

अहमदनगर :- तुमच्या मंत्र्यांना भ्रष्टाचारामुळे घरी बसावे लागले हे विसरलात काय? असा सवाल करतानाच तुमच्या अनेक मंत्र्यांविरोधात माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत ते बाहेर काढावे लागतील असा गर्भित  इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला आहे॰

        हजारे  यांनी उपोषण स्थगित केल्याच्या अनुषंगाने  शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून जहरी टीका करतानाच हजारे यांच्या भूमिकेविषयी  अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.केवळ कॉंग्रेसच्या राजवटीत हजारे आंदोलने करतात असा सूरही आळवण्यात आला आहे.त्यामुळे संतप्त झालेल्या हजारे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचे 'डिटेल्स' आपल्याकडे आहेत ते जाहीर करण्याचा इशारा दिला आहे.

       यावेळी हजारे यांनी सन १९९७ मध्ये आळंदीत झालेल्या आंदोलनाची आठवण करून दिली.या आंदोलनामुळे शिवसेनेच्या बबनराव घोलप शशिकांत सुतार या भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले.आपल्या मागणीनुसार स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती सावंत आयोगाच्या चौकशीत तत्कालिन मंत्री घोलप आणि सुतार गैरव्यवहार प्रकरणात दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. या गोष्टी तुम्ही विसरला काय असा सवाल हजारे यांनी शिवसेनेला केला.

           यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना हजारे म्हणाले की,मी कधीही कोणत्याही पक्षाच्या विरोधात आंदोलन केले नाही.माझे आंदोलन नेहमी समाजविघातक प्रवृत्तीच्या विरोधात राहिले आहे.माझे प्रयत्न,आंदोलने व्यक्ती अथवा पक्ष बदलण्यासाठी नव्हते तर भ्रष्ट बदलण्यासाठी होते.मी आतापर्यंत वीस उपोषणे केली.भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात आवाज उठवला.त्याची झळ सर्वच राजकीय पक्षांना बसली.भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना घरी बसावे लागले असे हजारे म्हणाले.भाजप सत्तेत आल्यापासून केंद्र सरकारच्या विरोधात सहा आंदोलने झाली आहेत.शेतकरी हिताच्या प्रश्नांबरोबरच भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करण्यासाठी, संरक्षण दलात 'वन रॅंक वन पेन्शन' या मागणीसाठी आंदोलन केले आहे.२३ मार्च २०१८ रोजी दिल्ली येथील रामलिला मैदानावर झालेले आंदोलन केंद्रामध्ये भाजप सत्तेत असताना झाले असल्याची आठवण हजारे यांनी करून दिली.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या