Ticker

6/Breaking/ticker-posts

3 पासून भातोडी पारगावला राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

 

अहमदनगर :-तालुक्यातील भातोडी (पारगाव) येथे ३ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक ३११११, द्वितीय २५५५५ व तृतीय १५५५५ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.  जिल्ह्यासह राज्यातील क्रिकेटप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संघर्ष मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रविण लबडे यांनी केले. यावेळी संयोजक टीमचे प्रतिनिधी आदिनाथ शिंदे, दत्ता कदम, राजु काळे आदी उपस्थित होते. 

 भातोडी येथे सालाबादप्रमाणे संघर्ष मित्र मंडळ आयोजित क्रिकेटप्रेमींसाठी नृसिह चषक ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी युवा नेते प्रवीण कोकाटे, भाजपा तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, पारेवाडीचे सरपंच राहुल शिंदे, विजयकुमार बोरुडे, राजेश परकाळे, माजी सरपंच बबनराव घोलप, चेअरमन विश्वनाथ कदम, उपसरपंच राजू पटेलश्रीकांत काळे, शिवसेना तालुका उपप्रमुख निसार शेख, साहेबराव आघाव, भाजपा नेते अल्ताफभाई पटेल, सुनील थोरात, गणेश आठरेग्रामसेवक अविनाश झाम्बरे, आदी उपस्थित राहणार आहेत. गतवर्षी राज्यभरातून ९० संघांनी सहभाग नोंदवला होता. याही वर्षी मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमीनी स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन संयोजक टीमने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या