Ticker

6/Breaking/ticker-posts

वाळुंज बायपास चे काम पूर्ण न केल्यास रस्तारोको

 अहमदनगर:- अर्धवट अवस्थेतील वाळूंज शिवारातील बायपास रोडचे काम आठ दिवसाच्या आत त्वरीत मार्गी लावावे अन्यथा, नगर- सोलापूर महामार्गावर रस्ता रोको करू असा इशारा नगर बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के यांनी जिल्हाधिकाऱ्याना निवेदनाद्वारे दिला आहे .

  नगर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उददेशाने बाहयवळण रस्ता करण्यात आता. वाळूंज ते आरणगाव ते केडगांव अशा बाहयवळण रस्त्याच्या डागडुजीसाठी कोटयावधी रुपयांचे काम एका खाजगी एजन्सीला दिलेले होते. सदरच्या एजन्सीने वेळकाढूपणा करुन त्या रस्त्याचे 
काम पुर्ण न करता वाळूंज शिवारातील एक किलोमिटरचा रस्ता अपूर्ण ठेवला आहे. या खाजगी एजन्सीकडून वेळकाढूपणा केला जात असल्याच्या तक्रारी वरीष्ठ पातळीवर करण्यांत आल्या आहेत. बाहयवळण रस्त्याच्या नियोजीत कामसाठी प्रकल्प आराखडा व अंदाजपत्रकाचे काम खाजगी एजन्सीला देण्यांत आले आहे. हे काम पूर्ण झालेल्या सांगण्यांत येते. प्रत्यक्षात मात्र या एजन्सीकडून हा अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाशिक विभागातील कार्यालयाकडून देण्यांत आली आहे.

            सदर एजन्सीने वाळूंज पासून एक किलोमिटर अंतराचे काम अपुर्ण ठेवले असल्यामुळे रोडलगत असलेल्या शेतातील पिके, हॉटेल व्यवसायीक हे अपूर्ण कामामुळे व खराब रोडवरील वाहतूकीच्या धुळीमुळे हैरान झालेले आहेत. शेतातील शेतमाल, भाजीपाला पिके यांचे नुकसान होत आहे. रोडलगतचे हॉटेल व्यवसायीकांचे धूळीमुळे प्रचंड हाल होत आहेत. तरी वाळूंज परीसरातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटी सदस्य, तसेच वाळूंज ग्रामस्थांच्या सख्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले ., येत्या आठ दिवसांत सदर एक किमी रस्त्यांचे काम पुर्ण न झाल्यास परीसरातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी नगर सोलापूर महामार्गावर सकाळी नऊ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यांचा इशारा दिला आहे . यावेळी बाजार समिती उपसभापती संतोष म्हस्के, बाळासाहेब दरेकर, महादेव शेळमकर,.सुखदेव दरेकर,मकरंद हिंगे, अमोल गायकवाड,अनिल मोरे,.रमेश दरेकर, रोहिदास पाडळे यावेळी उपस्थित होते .

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या