Ticker

6/Breaking/ticker-posts

उर्जा मंत्र्यावर गुन्हे दाखल करा –मनसे

 

लोकनेता न्यूज  ऑनलाईन

जामखेड :-कोरोनाच्या  महामारीमुळे देशभरात मार्च ते जून दरम्यान कठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरण'कडून वीज मीटर रीडिंग घेण्यासाठी प्रतिनिधी पाठवण्यात आले नाही.परंतु भरमसाठ वीज देयके वितरित करण्यात आले आहेत.त्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जास्तीचे बिले व त्याकालीतील आलेले बिले माफ करणार असे वेळोवेळी सांगितले होते परंतु या बिलात एक रुपयाही कमी केला नाही. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऊर्जा मंत्र्यांसह महावितरण'च्या अधिकाऱ्यांविरोधात आर्थिक लुबाडणूक व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बिलाबत फसवणूक केली आहे म्हणून उर्जा मंत्री व महावितरणच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा अशा मागणीचे निवेदन जामखेड पोलीस ठाण्याला दिले आहे. 

                 घरात बंदिस्त असलेल्या जनतेला या कालावधीत वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून वापरापेक्षा दुप्पट-तिप्पट रकमेची अवाजवी व भरमसाठ बिले पाठवली गेली. ही  वीज बिले पाहून गोर गरीब जनतेसह शहरातील मध्यमवर्गीयांना भोवळ आली. कोरोना महामारी मध्ये व्यापार उद्योगधंदे बंद होऊन असंख्य लोक बेघर झाले असताना अनेकांच्या पगारात २० ते ५० टक्के कपात झाली .उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले परंतु तरीही वीज बिलांच्या भरमसाट भरणा करण्याचा तगादा महावितरण कंपनीने लावला. हे शक्य नाही म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेसह इतर राजकीय पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे तक्रारी मांडल्या त्यानंतर ऊर्जामंत्री  व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, वीज कंपनीचे अधिकारी यांच्यात अनेक बैठका झाल्या. बैठकीनंतर वीजबिलात कपात करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा देऊ असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

याबाबत ऊर्जामंत्री वीजबिल माफीच्या शब्दाला जगातील त्यामुळे वीजबिलात कपात होऊन संकटकाळात थोडासा आर्थिक दिलासा मिळेल या आशेवर राज्यातील जनता होतील मात्र ऊर्जामंत्री यांनी घुमजाव केले. आणि प्रत्येकाला वीज बिल भरावे लागेल असे फर्मान काढले त्यामुळे ऊर्जा मंत्री व महावितरण कंपनीने संगणमत करून मानसिक व आर्थिक ,लुबाडणूक फसवणूक केली असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या यांच्या  वतीने करण्यात आली.यावेळी तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, माजी सरपंच दादासाहेब सरनोबत,शहराध्यक्ष बालाजी भोसले,उपाध्यक्ष सनी सदाफुले, गणेश पवार,बाला साठे,देवा कुलकर्णी, संदीप गायकवाड यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते  उपस्थित होते.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या