Ticker

6/Breaking/ticker-posts

आम्हाला फरक पडत नाही..! काय म्हणाले खा .राऊत वाचा..



लोकनेता न्यूज  ऑनलाईन

 
मुंबई :  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्ंनी कर्नाटक सरकारला चांगलच सुनावल आहे . "अनेक वर्षांपासून कर्नाटकचे काही नेते अशा प्रकारचं राजकारण करत आहे. परंतु, कायद्याने काय व्हायचं ते होईलचं, पण आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरू नये. कालची बैठक ही निर्णायक बैठक होती, एवढचं मी सांगतो. या विषयावर ज्या पद्धतीनं पावलं टाकायला पाहिजेत, ती टाकायचला सुरुवात झालेली आहे. कुणी तिकडं काही बरळलं तरी इकडं आम्हाला फरक पडत नाही." अशा शब्दात. संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

            कर्नाटकचा प्रश्न केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून दोन राज्यांतील सीमाप्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळलं पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे, अंस संजय राऊत कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले आहेत. तसेच आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे सुद्धा कर्नाटकच्या सरकारने आता विसरु नये, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा, अस म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक सरकारवर निशाणा साधला होता. यालाच प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांनी कर्नाटकातील मराठी भाषिकांना मुंबई कर्नाटकात सामील करण्याची इच्छा आहे, असं म्हटलं.

            संजय राऊत बोलताना म्हणाले की, "काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं. तेव्हा त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व अन्य नेते होते. कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. त्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे." पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "मुंबई, महाराष्ट्रात जे आमचे कानडी बांधव राहतात, आम्ही त्यांच्यावर कुठलीही सक्ती केलेली नाही. त्यांना संपूर्ण स्वातंत्र्य आहे. इथं कानडी शाळा आम्ही चालवतो. आम्ही कानडी शाळांना अनुदान देतो. इथं अनेक कानडी संस्था देखील चालवल्या जातात. पण बेळगाव सारख्या भागात ही परिस्थिती आहे का? ही लढाई कशासाठी आहे? ही लढाई आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्यासाठी आहे. आम्ही काय देशाच्या बाहेर जा असं कधी कुणाला म्हणत नाही."

        कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून संजय राऊत म्हणाले की, "कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा मुंबईत, महाराष्ट्रात यावं आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी. इथं ते उद्योग क्षेत्र, हॉटेल क्षेत्रात जे कामं करतात, हे सर्वजण आमचेच आहेत. उद्या त्यांच जर मतदान घेतलं इथं, तर ते देखील सांगतील की बेळगाव महाराष्ट्रातचं आलं पाहिजे."असा इशारा देखील संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला यावेळी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या