Ticker

6/Breaking/ticker-posts

'त्या' महिलेचे शिर शोधण्यासाठी पोलिसांची दमछाक ..! 'महिलेच्या मृत्यू बाबत अस्पस्टता, मुलाचा मृत्यु डोक्यात टनक वस्तु मारल्याने

 

शेवगाव :- 'त्या' महिलेचे शिर शोधण्यासाठी पोलिसांनी पिंजून काढला परिसर. शेवगाव व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रत्येकी दोन पथके आरोपीच्या शोधास रवाना. दुहेरी हत्याकांड प्रकरणात हत्या झालेल्या महिलेचे शिर शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळच्या सभोवताली दोन कि.मि. काट्या कुट्याचा परिसर सोमवारी सकाळी पिंजून काढला, मात्र गायब असलेले शिर पोलिसांना मिळून आले नाही. सदर हत्या कोणी व का केल्या याचा तपास लावण्यासाठी शेवगाव पोलिसांचे एक पथक नाशिककडे तर दुसरे पथक मध्यप्रदेशातील चिचोडिया गावी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नाशिक तर दुसरे पथक शेवगाव परिसरात रवाना करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सांगितले.

        रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास  शिर नसलेले महिलेचे धड पोलिसांना मिळून आल्याने शिराचा शोध घेताना आणखी एक युवकाचा मृतदेह जवळच्या झुडपात आढळून आला होता.त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली, मात्र पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नाहीत. रविवारी रात्री पोलीस अधीक्षक मनोजकुमार पाटील हे रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शेवगावात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांना तपासाच्या सुचना केल्या व ते रात्री एक वाजण्याच्या सुमारास अहमदनगरकडे रवाना झाले. महिलेचे शिर विरहित धड मिळून आल्याने तसेच त्यांची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी आसपासच्या परिसरात कसून पाहणी केली, मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही. 

           सदर महिलेच्या मृतदेहाचा हात प्रथमदर्शनी वन्यजीव प्राण्याने खाल्ला असावा अशी शक्यता असल्याने पोलिसांनी शोधकामी वन विभागाचे सहकार्य घेतले. घटनास्थळापासून एका प्राण्याच्या पाऊल खुणा दिसून आल्याने त्याचे मोबाईलमध्ये छायाचित्रे घेऊन पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी सहायक वन संरक्षक सुनिल पाटील यांना पाठविले होते, त्यांनी ते ठसे तरसाचे असावे असे सांगितले. दरम्यान पाथर्डी-शेवगावचे वन क्षेत्रपाल शिरीषकुमार निर्भवने, वनपाल पांडुरंग वेताळ, आप्पा घनवट यांनी घटनास्थळी भेट देऊन 'त्या' ठस्यांची पाहणी केली असता ते ठसे कुत्र्याचे असल्याचे सांगितले. हि हत्या करणी कवटल दृष्टीकोणातुन झाली की काय अशा सर्व शक्यता पडताळून पोलिसांनी आरोपीची शोध मोहीम हाती घेतली आहे.  शेवगाव पोलिस ठाण्याचे सुमारे ३५ कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटे ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घटना घडलेल्या जागेपासून सुमारे दोन किलोमीटर परिघाचा परिसर पिंजून काढला. यावेळी पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे हे शोध घेत असतांना उपअधीक्षक सुदर्शन मुंडे,  अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल हे ही दाखल झाले. हत्याकांडातील मृतदेह शविच्छेदनास प्रवरानगर येथे पाठविण्यात आला होता.  शेवगाव शहरातील हत्याकांडातील मृत महिलेचा व मुलाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असुन महिलेच्या मृत्युबाबत अस्पस्टता आहे तर मुलाचा मृत्यु डोक्यात टनक वस्तु मारल्याने झाला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या