Ticker

6/Breaking/ticker-posts

महाजन – मुंडे यांची नावे थोर व्यक्तींच्या यादीत सामाविष्ट करा


लोकनेता न्यूज ॲानलाईन.

भारतीय राजकारणातील आधुनिक चाणक्य स्व. प्रमोद महाजन व लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांची नावे थोर व्यक्तींच्या यादीत सामाविष्ट करण्यात यावीत अशी मागणी महाजन-मुंडे विचारमंचने केली आहे .

 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मंचचे अर्जुन गिते यांनी मेलव्दारे केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत राष्ट्रसेवेत व लोकसेवेत आपले आयुष्य वेचणारे दिवंगत स्व. प्रमोद महाजन व दिवंगत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे या थोर व्यक्तींनी राज्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या गौरवपूर्ण समावेश व उल्लेख करणे तितकेच गरजेचे आहे. 

सामान्य प्रशासन विभागाने राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींची जयंती व पुण्यतिथी राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्यात येते.तसेच मंत्रालय शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरे करायच्या जयंती राष्ट्रीय दिन कार्यक्रमाची यादी जारी केली आहे.  41 थोर पुरुषांच्या यादीत 14 जानेवारी च्या सुधारित यादीत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे व हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नावे शासन निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने समाविष्ट केले आहेत, या निर्णयाचे  स्वागतच आहे .

  महाजन मुंडे यांच्या वर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे की, दिनांक 23 जानेवारी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी स्व.प्रमोद महाजन यांनी अंबेजोगाई या शहरातुन येऊन राष्ट्रीय स्तरावर काम केले आहे.तसेच नाथ्रा तालुका परळी या छोट्याशा गावातून येऊन स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी 40 वर्षे संघर्ष करुन गोरगरीब, ऊसतोड मजूर, वंचित व बहुजन समाजातील घटकांसाठी आपले सर्व आयुष्य वेचले. अशा दोन्ही व्यक्तींचा समावेश थोर व्यक्तींच्या यादीत  करावा अशी मागणी  या निवेदनात अर्जुन गिते यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या