Ticker

6/Breaking/ticker-posts

भीमा नदी पत्रात वाळू तस्करावर कारवाई, 6 लाखाचा ऐवज जप्त

 

अहमदनगर ,:-  पो.नि.चंद्रशेखर यादव , कर्जत पोलीस स्टेशन यांनी रुजू झाल्यापासून सर्व अधिकारी व अंमलदार यांना आपल्या हद्दीतील अवैध व्यवसाय वर कारवाई करून पूर्णतः बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने   पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव यांना  गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दुधोडी गावच्या शिवारात  भीमा नदीच्या पात्रात फायबर बोटीच्या साह्याने अवैध वाळू उपसा होत आहे.  लगेच स.पो.नि. सोमनाथ दिवटे व पोलीस यांना बातमीतील हकीगत समजावून सांगून खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले.

                 त्या अनुषंगानेच कर्जत पोलिसांची भीमा नदी पत्रात वाळू तस्करावर  कारवाई. दोघांवर गुन्हा दाखल सहा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला  आहे.   स.पो.नि. सोमनाथ दिवटे व पोलीस यांनी दुधोडी गावचे हद्दीत भीमा नदी पत्रात जाऊन एक फायबर बोट व एक सेक्शन मशीन ( एकुण किंमत - 6,10,000/-) जप्त केले असुन त्याचे मुळ मालक नाना गवळी, रा कानगाव , ता दौडं.जि.पुणे व सुपेकर , रा कुळधरण, ता कर्जत, जि.अ.नगर (पूर्ण नाव माहीत नाही) यांचे वर कर्जत पोलिस स्टेशन गु.र.न  08/2021 भा.द.वि.स.कलम 379 ,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.                           

  सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल , उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, कर्जत विभाग व  पोलीस निरीक्षक  चंद्रशेखर यादव, कर्जत पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली,  राशीन पोलीस दुरक्षेत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक, सोमनाथ दिवटे  व पोलीस स्टाफ तुळशीराम सातपुते, भाऊसाहेब काळे, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, मनोज लातुरकर, सुनिल खैरे, गणेश भागडेसंपत शिंदे, मारुती काळे यांनी केली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या