Ticker

6/Breaking/ticker-posts

संभाजीनगरला आमचा विरोध - कॉंग्रेस प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात


·        


   नवी मुंबई – औरंगाबादचं लवकरच नामकरण संभाजीनगर होणार याची चर्चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या औरंगाबादच्या दोऱ्या नंतर सुरु झाली होती, आणि या नामांतरसाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली देखील सुरु आहे . मात्र या नामांतरणाला कॉंग्रेस प्रदेशअध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी यांनी विरोध करत म्हणाले कि, संभाजीनगर नाव करण्याला आमचा विरोध असेल. महाविकास आघाडी विकासाच्या मुद्द्यावर स्थापन करण्यात आली आहे. सरकारनं सामान्य माणसाचं जीवन सुखी कसं होईल हे पाहायचं, हा कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मुख्य हेतू आहे. महाविकास आघाडीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये अशाप्रकारे शहरांचं नाव बदलण्याचं ठरलेलं नाही.

·            बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, नाव बदलण्याचा हा अजेंडा आम्हाला मान्य नाही,नाव बदलावर काँग्रेसचा विश्वास नाही. शहराच्या नावात बदल करुन काही होत नाही, काही गोष्टींचा इतिहास बदलू शकत नाही. आम्ही विकासाची वाटचाल सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून करत आहोत, हे आमचे सूत्र आहे आणि हे राज्य घटनेच्या मूलभूत तत्त्वांना धरुन आहे. शहराच्या नावात बदल करणे ही गोष्ट आम्हाला मान्यच नाही. या प्रस्तावाला निश्चितच आमचा विरोध राहणार.

        आता लवकरच औरंगाबाद महानगर पालिका निवडणूक येणार आहे या मुळे सत्ताधारी शिवसेना , महाराष्ट्रा नवनिर्माण सेन आणि एआयएमआयएम या पक्षात परत एखदा या विषयवर आणखी राजकारण होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या