Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जतला नगराध्यक्षपदानंतर आता, उपनगराध्यक्ष बदलाचे वारे..!

नगराध्यक्षपदी भाजपाच्या छाया सुनील शेलार; उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल


लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

कर्जत- कर्जत नगरपंचायतीचे  शिवसेनेचे उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे यांच्याविरुद्ध  भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ( शरद पवार गट) तेरा नगरसेवकांनी अविश्वास ठराव नगराध्यक्षा छाया शेलार यांच्याकडे दाखल केला, त्यांनी तो ठराव कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांना सादर केला, नगराध्यक्ष निवडीनंतर आता उपनगराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहेत


कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या छाया सुनील शेलार यांची काल निवड करण्यात आली, या निवडी नंतर त्यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला यानंतर कर्जत शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी फटाके फोडून गुलालाची उधळण करण्यात आली, विधान परिषदेचे सभापती व भाजपा नेते राम शिंदे व  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या  विजयाच्या व जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.


कर्जत नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्षा रोहिणी घुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर, नगराध्यक्ष पदासाठी छाया शेलार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आला होता, आज प्रांत अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली, यानंतर पदभार स्वीकारला यावेळी कर्जत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते, विषेश म्हणजे जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल अमीत चिंतामणी यांनी हजेरी लावली. यानंतर सर्व नगरसेवक नगरसेविका व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मिरवणूकीने जाऊन कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरू गोदड महाराज यांचे दर्शन घेतले.


या मिरवणुकीत कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा छाया शेलार, गटनेते सतीश पाटील, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक अमृत काळदाते, प्रसाद ढोकरीकर, नगरसेविका ताराबाई कुलथे,  उषा अक्षय राऊत, सुवर्णा सुपेकर,  मोनाली तोटे, लंकाबाई खरात, प्रतिभा भैलुमे, अश्विन दळवी, मोहीनी पिसाळ आदी उपस्थित होते भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा छाया शेलार यांनी आज पदभार स्वीकारला यावेळी कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विनोद दळवी, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव, तालुकाध्यक्ष अनिल गदादे,  सुनील शेलार,  सचिनशेठ कुलथे, ओंकार तोटे, लालासाहेब शेळके, किसान आघाडीचे  तालुकाध्यक्ष दत्तात्रय नलवडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर, माजी सभापती नानासाहेब निकत, युवक नेते धनंजय आगम आदी उपस्थित होते.

---


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या