अहिल्यानगर-जिल्ह्यातील विविध महामार्गाची अत्यंत दूरावस्था झाली असून रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. त्यामुळे सर्वमसामन्यांचा हकनाक बळी जात आहे. कालचा रविवार हा जिल्ह्यासाठी अपघात वार ठरला. नगर- मनमाड , जामखेड आणि पुणे- नाशिक महामार्गावर रविवारी (दि. १९) रोजी झालेल्या तीन वेगवेगळया अपघातात ३ जण ठार तर ९ जण गंभीर जमखी झाले.
नगर -मनमाड मार्गावरील कोल्हार खुर्द येथे सकाळी नऊच्या सुमारास खड्डा चुकविण्याच्या नादात दुचाकीला ट्रकने धडक दिल्यामुळे या अपतात दुचाकीवरील ज्योती माळी (वय-५५ ,रा. नरसाळी तालुका श्रीरामपूर) या ट्रक खाली सापडून जागीच ठार झाल्या. रस्त्यावरील खड्डयांमुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. दुचाकीवरील त्यांचा मुलगा व एक चिमुकली सुदैवाने बाचावले. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवर मागे बसलेल्या ज्योती माळी या खाली पडताच ट्रकच्या चाकाखाली आल्या. तर त्यांचा मुलगा आणि नात रस्त्याच्या कडेला फेकले गेले.
दुसर्या अपघात राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८वर गरडयाचा पाटोदा ता. जामखेड जवळ झाला. टेम्पो व कार यांची समोरासमोर तडक होऊन झालेल्या भीषण अपघातात विकील बहूरे व रामचंद्र बहूरे हे दोघे शासकीय कर्मचारी जागीच ठार झाले. रस्ता दुरूस्तीसाठी वाहतूक एकेरी ठेवल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर १०८ रूग्णवाहिकेतून उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषीत केले. या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू होते.
तिसरा अपघात नाशिक- पुणे महामार्गावरील घारगाव परिसरात झाला. यामध्ये भरधाव ट्रकचा एक्सल तुटल्याने चालकांचे नियंत्रण सुटून ट्रक विरुद्ध दिशेने जाणार्या कारवर धडकला. त्यामध्ये कारमधील नऊ जण गंभीर जखमी झाले. त्यांना संगमनेर व आळेफाटा येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे कालचा रविवार हा अपघात वार ठरला.
0 टिप्पण्या