लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव ( प्रतिनिधी ) : सामनगाव, ( ता. शेवगाव ) येथील हरहुन्नरी छायाचित्रकार व पत्रकार सचिन सातपुते यांनी आपले दिवंगत वडील सर्जेराव मार्तंड सातपुते यांचे स्मृतिदिनानिमित्त शेवगावच्या गुरुदत्त सामाजिक संस्था संचलित योगतज्ञ प. पू. दादाजी वैशंपायन वृद्धाश्रमातील १५ आजी - आजोबांना मिष्ठान्न भोजन प्रसादाबरोबरच वस्त्रदान करून समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.
श्री. सातपुते यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे गुरुदत्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके, सचिव फुलचंद रोकडे तसेच श्रीदत्त देवस्थान साधक समूह व दत्त भक्तांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
गुरुदत्त सामाजिक संस्थेमार्फत शासनाच्या अनुदानाशिवाय सेवाभावी वृत्तीने वृद्धाश्रम चालविला जातो. त्यासाठी दैनंदिन खर्च मोठा आहे. दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संघटना, सेवाभावी संस्था तसेच समाजातील घटकांनी वैयक्तिकरित्या पुढे येऊन किराणा सामान, धान्य, वस्तू व आर्थिक योगदान देऊन या सत्कार्यास हातभार लावावा, असे आवाहन श्री. सातपुते यांनी केले आहे.
0 टिप्पण्या