Ticker

6/Breaking/ticker-posts

नारायण सांगळे यांचे ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)       

आष्टी -तालुक्यातील कर्हेवाडी येथील रहिवाशी नारायण आबा सांगळे (वय- 55 वर्ष) यांचे मंगळवार (दि. 15) रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.  ते यात्रेनिमित्त गावी आले होते. त्यांना अचानक पहाटे झोपेतच हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

नारायण सांगळे हे पारनेर तालुक्यातील पळशी येथील आश्रम शाळेवर सेवेत होते. तत्पूर्वी त्यांनी नाबार्ड पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पामध्ये पाणलोट सेवक म्हणून 6 वर्षे काम केले .त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या