लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहिल्यानगर: काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांची काँग्रेसने उमेदवारी कापल्यानंतर त्यांनी तत्काळ वेगवान हालचाली करून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. परंतु निर्णय न झाल्यामुळे लगेचच अजित पवार यांच्याशि संपर्क साधला. दादांनाही लॉटरी लागली.त्यांनी जुळवा जुळव केली. त्यामुळे श्रीरामपूरचि जागा जवळपास अजितदादा गटाला सुटल्यात जमा आहे. तशी चाचपणी करून लहू कानडे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आता कानडे हे घड्याळ चिन्हावर श्रीरामपूर मधून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान कानडे हे मतदारसंघातून करणारे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत .तरीही काँग्रेसने येथून त्यांना यावेळी डावलून युवा नेते हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या कानडे यांनी तत्काळ मुंबई गाठून प्रथम शिंदे शिवसेना आणि त्यानंतर लगेचच अजित दादांची राष्ट्रवादी आपलीशी केली. चर्चेनंतर राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. परिणामी शिवसेनेने श्रीरामपूर येथील आणखी एक पारंपारिक जागा सोडली असेच म्हणावे लागेल.
या नवीन राजकीय समीकरणामुळे मात्र अजित दादांना आणखी एका जागेची माहिती संधी चालून आली, ती सोडतील ते दादा कसले. त्यांनी लगेच कार्यकर्त्यांशी विचार विनिमय चर्चा करून कानडे यांना उमेदवारी बहाल केल्याचे जवळपास निश्चित झाले आहे . उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे श्रीगोंदा मतदारसंघात झालेल्या हालचालींपेक्षाही कमी वेळेत कानडे यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.
0 टिप्पण्या