Ticker

6/Breaking/ticker-posts

शस्त्र धारकांनी शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश !

 




लोकनेता  न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना त्यांची शस्त्रे संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यात जमा करण्याचे सक्त आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जरी केले आहेत. 

राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखीत संपन्न होण्याच्या दृष्टीने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सालीमाठ यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करीत विविध आदेश जारी केले आहेत.


त्यानुसार जिल्ह्यातील परवानाधारक शस्त्र धारकांना त्यांच्याकडे असलेली शस्त्रे तात्काळ जमा करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या मुदतीपर्यंत म्हणजे मंगळवार दि.२९ ऑक्टोबरपर्यंत शस्त्रधारकांनी त्यांचे हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये शस्त्रे जमा करण्याचे फर्मान जारी झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात अपर अपर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्या संचालनात गृहशाखेमार्फत कार्यवाही सुरू झाली आहे.

 जिल्ह्यात एकूण तीन हजार ८७ शस्त्र परवानाधारक आहेत. त्यापैकी बॅंक, सुरक्षा रक्षक, आडरानात वस्तीवर रहाणारे ७३५ वगळता २ हजार ३५२ परवानाधारकांना त्यांची शस्त्रे जमा करण्याचे आदेश गृह शाखेमार्फत बजावले गेले आहेत. गुरुवारपर्यंत एकूण २२७ परवानाधारकांनी त्यांची शस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात जमा केली आहेत. उर्वरित परवानाधारकांना नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या अखेरच्या दिनांकापर्यंत म्हणजेच येत्या १२ दिवसात त्यांच्याकडील शस्त्रे जमा करणे बंधनकारक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या