(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
श्रीगोंदा (प्रतिनिधी):- श्रीगोंदा येथील सभेत कार्यकर्त्यांनी आग्रह धरला तो राहुल जगताप यांच्या उमेदवारीच्या घोषणेचा त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले जागा वाटप झाल्याशिवाय उमेदवार जाहीर करु नये असे ठरल्याने आजच घोषणा करता येणार नाही, पण श्रीगोंदा मतदार संघ राष्ट्रवादीकडे घेण्याचा प्रयत्न असून मिळेलही तसेच तुमच्या मनात जो उमेदवार आहे, तोच माझ्याही मनात आहे. कामाला लागा तुतारी चिन्ह घरा घरात पोहोचवा.असे जगताप यांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीं दिले.
ते पुढे म्हणाले की, भाजपची नियत नेहमीच शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळू नये, अशी असल्याने निर्यात बंदी तर कधी कांदा आयात करून येथील भाव पडायचे असल्याने या सरकारला येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी श्रीगोंदा येथे शिव स्वराज्य यात्रा निमित्त आयोजित सभेत बोलताना केले.
अध्यक्ष स्थानी ज्येष्ठ नेते सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व्हॉईस चेअरमन बाबासाहेब भोस होते.
आमदार पाटील म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुती जास्त खासदार येतील अशा आविर्भावात होती पन्ना प्रमुख,बूथ प्रमुख असे नियोजन केले होते पण एकदा लाट आली की पन्ना प्रमुख बूथ प्रमुख कागदावर राहिले आणि पाटील म्हणाले सद्या विरोधी पक्षाच्या आमदारांना मतदारच सांगत आहेत तुतारी चिन्ह घ्या म्हणून खासदार शरद पवार यांच्या भेटीला रांग लागली आहे पण आम्ही लोकसभा निवडणुकीच्या वेळी ज्यांनी साथ दिली त्यांना संधी देणार आहोत.
महायुती सरकारने खडा बाजूला करावा तसे विरोधी पक्षाच्या साखर कारखान्यांना बाजूला करत कर्ज नाकारले तरीही खासदार शरद पवार यांनी राहुल जगताप यांच्या कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याला मदत केली आणि येत्या ५ तारखे पर्यंत सर्वांचे देणे त्यातून भागणार आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार राहुल जगताप यांनी महा विकास आघाडीला आपण लोकसभा निवडणुकीत मदत केली खासदार निलेश लंके यांना मताधिक्य मिळवून दिले बदल्यात कुकडी साखर कारखाना अडचणीत आणून झुकविण्याचा प्रयत्न झाला पण आपण झुकलो नाही अखेर खासदार शरद पवार यांनी मदत केल्याने ५ तारखेच्या आत सर्व देणी देणार आहे पक्षाने देखील सद्या भेटणाऱ्यांची गर्दी वाढत असली तरी लोकसभेला ज्यांनी दुर्लक्ष केले त्यांना संधी देऊ नका निष्ठावतांना डावलू नका असे आवाहन केले.
यावेळी खासदार अमोल कोल्हे,खासदार निलेश लंके,महेबुब शेख यांची भाषणे झाली.
आम्ही देखील लाडकी बहिण योजना प्रभावीपणें राबविणार
महा विकास आघाडी उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येताच राज्यातील सरकारने तिजोरीचे दरवाजे बाजूला काढून ठेवले लाडकी बहिण योजना आणली कर्ज वाढले पण त्यांना माहित आहे जाता जाता मोकळी तिजोरी महाविकास आघाडी सरकारकडे द्यायची आम्ही देखील लाडकी बहिण योजना प्रभावी पणें राबविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
------------------------------------------------
0 टिप्पण्या