लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई / अ' नगर:-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ग्रंथालयाना राहिलेले उर्वरित 40 % टक्के अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंञशिक्षण मंत्री चंद्रकात दादा पाटील यांनी दिली.
मंगळवारी दि.2 जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पाथर्डी -शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली ना. पाटील यांची मुंबईत विधानभवनातील त्यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ग्रंथालयाच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यातील ग्रंथालये आणी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नसंदर्भामध्ये ना. पाटील यांचेशि चर्चा झाली.
त्यावर नाम. पाटील यांनी, अनुदानातील उर्वरित 40 % वाढ तातडीने देण्यात येईल. तसेच केंद्र सरकारकडून मिळणारे 400 कोटी तातडीने उपलब्ध करून सर्व वर्गाच्या वाचनालयाना त्याचे समप्रमाणात वितरण करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच दर्जा वाढीचा प्रलंबित प्रश्न आणि नव्या वाचनालयांना मान्यता देणे यासंदर्भात लवकरच घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या शिष्टमंडळात ग्रंथालय चळवळीत काम करणारे प्रमुख कार्यकर्ते सर्वश्री विष्णुपंत पवार, संजय कराळे (पाथर्डी) नामदेव गरड (शेवगाव) पनाजी कदम (कर्जत) सुरेंद्र शिंदे (पारनेर) संदीप पठाडे मच्छिंद्र पाटील आठरे विलास कांबळे यावेळी उपस्थित होते .
आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भेटीत ना. पाटील यांनी ग्रंथालयाच्या प्रलंबीत प्रश्ना संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ग्रंथालय कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष् लागले आहे.
अधिवेशनात घोषणांचा पाऊस ; ग्रंथालय चळवळ मात्र अडगळीतच
.
सध्या निवडणुकांचा हंगाम सुरू आहे. नुकत्याच लोकसभा पार पडल्या. त्यात महायुतीच्या तोंडी फेस आला. 3-4 महिन्यावर विधानसभा निवडणुक आली. तेव्हा खडबडून जागे झालेल्या सत्ताधाऱ्यांनी लोकप्रिय घोषणांची कास धरली. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात घोषणांचा पाऊस पडत असताना वर्षानुवर्षे अडगळीत पडलेली ग्रंथालय चळवळ मात्र सरकारच्या खिसगिनतीतही नाही, हे विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल. ना. चंद्रकांत पाटील वगळता आख्या मंत्रिमंडळाला या वाचन चळवळच काही घेणे-देणे व सोयरसुतक राहिलेले नाही, अशीच भावना ग्रंथालय कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांची झाली आहे.
0 टिप्पण्या