Ticker

6/Breaking/ticker-posts

शरदचंद्र पवार समर्थित शेकापचे जयंत पाटील पराभूत..










लोकनेता  न्यूज 

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील व्यक्ती आणि सर्वपक्षीयांशी सुमधूर संबंध राखून असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत सगळ्यांचे अंदाज चुकवत राजकीय चमत्कार करुन दाखवला. मिलिंद नार्वेकर यांना शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

 विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे या जागेसाठी चुरशीची लढत होणार हे अपेक्षित होते. महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाकडे असलेले आमदारांचे संख्याबळ पाहता 11 व्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर यांना संघर्ष करावा लागेल, असे चित्र होते. पण विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मतमोजणी सुरु झाल्यानंतर 274 मतांची 11 गठ्ठ्यांमध्ये विभागणी करण्यात आली. या मतांची मोजणी सुरु झाली तेव्हा पहिल्या टप्प्यातच मिलिंद नार्वेकर यांनी अनपेक्षितपणे मोठी आघाडी घेतली. आणि  विजय मिळविला. 

विधान परिषदचे नव निर्वाचित आमदार असे-

भाजपचे विजयी उमदेवार..

1. पंकजा मुंडे
   2  योगेश टिळेकर
3. परिणय फुके
4. अमित गोरखे
5. सदाभाऊ खोत

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार

6. भावना गवळी
7. कृपाल तुमाने

 राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

   8. राजेश विटेकर
9. शिवाजीराव गर्जे

काँग्रेस विजयी उमेदवार

10. प्रज्ञा सातव –

शिवसेना ठाकरे गट

11. मिलिंद नार्वेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या