लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
बीड :- बीड लोकसभा निवडणूक निकाल हाती येत असून अत्यंत चुरशीने सुरू असलेल्या या लढतीत प्रारंभी पासूनच प्रत्येक फेरीला तुंबळ लढाई सुरू आहे.
कधी पंकजा ताई मुंडे आघाडीवर तर कधी बजरंग सोनावणे अशी निकराची झुंज सुरू आहे. तथापि नुकत्याच पार पडलेल्या २९ व्या फेरीअखेर भाजपा उमेदवार पंकजा ताई यांनी सोनावणे यांच्यावर तब्बल २४ हजाराची आघाडी घेत विजया कडे घौडदौड सुरू केली आहे.
आणखी १३ फेर्या आणखी व्हायच्या आहेत. त्यामुळे असाच लीड वाढत जाण्याचा अंदाज असून ताई या निकरा च्या लढाईत बाजी मारतील असा रागरंग आहे. अटीतटीच्या या झुंजीत पंकजा ताई निर्णायक आघाडीवर आल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बीड ची ही निवडणुक राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची व राज्यात तेवढीच प्रतिष्ठेची ठरली आहे. जाती पतीच्या राजकारणात मुंडे आणी तमाम वंजारी समाजाच्या अस्तित्वाची ही निर्णायक लढाई आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि समाजाने काशाची हीं तमा न बाळगता प्रत्येकाने स्वतः ला झोकून दिले आहे. त्यामूळे संपुर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
0 टिप्पण्या