लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव : समाजाप्रती असलेल्या दायित्वाची जाण म्हणून शिक्षण,आरोग्य, जलसंधारण,वृक्षारोपन आदी विविध क्षेत्रामध्ये भारत फोर्ज कंपनीने मोठे काम उभे केले आहे.दुष्काळावर व वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी जलसंधारण व वृक्षारोपन ही भविष्यातील सर्वात मोठी गरज असून त्यादृष्टीने कंपनी गावोगावी अर्थ व तंत्रसहाय्य देवून जलसंचयाला व पर्यावरण संतुलनाला मदत करत आहे.या कामात नागरिकांनी आपले योगदान देवून व्यापक लोकचळवळ उभी करावी,असे आवाहन पुणे येथील भारत फोर्ज कंपनीच्या सामाजिक दायीत्व विभागाच्या प्रमुख डॉ. लिना देशपांडे यांनी केले.
सामनगाव,(ता.शेवगाव) येथील ढोरा नदीवरील बंधा-याच्या खोलीकरणाचे काम भारत फोर्ज कंपनी मार्फत करण्यात येत आहे.या कामाच्या पाहणीनंतर देशपांडे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.त्यावेळी त्या बोलत होत्या.कंपनीचे सामाजिक दायीत्व विभागाचे समन्वयक जयदीप लाड,जलदूत श्री.भालसिंग,ज्येष्ठ नेते अँड.वसंतराव कापरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संदिप सातपुते,शिवाजी भिसे, हरिश्चंद्र वांढेकर,सरपंच आदिनाथ कापरे,उपसरपंच संगिता नजन आदी यावेळी उपस्थित होते.
देशपांडे पुढे म्हणाल्या,पाणी ही भविष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे.त्या दृष्टीने जलसंचय करणारी गावे यापुढे सर्वात श्रीमंत व संपन्न म्हणून गणली जाणार आहेत.नदीला आई समजुन तिचे संवर्धन व जतन करणे काळाची गरज आहे. जलसंधारणाच्या कामाला लोकचळवळीचे स्वरुप आल्यास आपले भविष्य अधिक सुरक्षीत होण्यास मदत होणार आहे.
यावेळी श्री.कापरे व श्री.भालसिंग, बाळासाहेब गव्हाळ आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी रमेश कापरे, दीपक भुसारी, सचिन सातपुते, शिवाजी कापरे, आदिनाथ नजन, अनंता वांढेकर, अरुण काळे, प्रमोद कांबळे,किरण कापरे,श्रीकांत मिसाळ,समीर सातपुते, साईनाथ सातपुते, भगवान कापरे,दत्तात्रय खरड,रवींद्र सातपुते,कृष्णा सातपुते,जनार्दन वांढेकर,बाबासाहेब जाधव,लक्ष्मण जाधव,बाजीराव कोकाटे,दत्ता जाधव ,नानासाहेब बनसोडे,संजय बडे आदींसह सामनगाव व मळेगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रास्तविक संदिप झाडे यांनी तर, सुत्रसंचालन राजू घुगरे यांनी केले. सरपंच आदिनाथ कापरे यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या