लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
सोमराज बडे
आष्टी, जि.बीड: गहिनीनाथ गड चिंचोली
आपण सर्व जण ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त एकत्र आलो आहोत त्या श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या मुळेच.मी उपमुख्यमंत्री म्हणून आज आलेलो नाही तर गडाचा सेवेकरी म्हणून आलो आहे. मागील वर्षी मजूर केलेल्या पंचवीस कोटीचे कामें सुरू केली आहेत. यापुढेही सुधारित आराखडा तयार करण्यात येईल व त्यासाठी अजून पंचवीस कोटी रुपयांची तरतूद येणाऱ्या अर्थसंकल्पात करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
संत वामनभाऊ महाराज यांचा ४८वा पुण्यतिथी सोहळा लाखो भाविक भक्तांच्या उपस्तितीत आज(ता.३)रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, प्रकाश आंबेडकर आदीं यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरील विविध विकास कामांचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, या नाथांच्या ठिकाणी अठरा पगड जातीचे लोक एकत्र येत असतात. भाविकांची सोय व्हावी यासाठी हभप. महंत विठ्ठल महाराज यांची तळमळ आहे. ती आम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आपल्या राज्याला वारीचे महत्व मोठे आहे. गडाचा वारीमार्ग विना अडथळा व्हावा, यासाठी प्रस्ताव तयार करून तो मार्ग तयार करण्यात येणार असल्याचे या प्रसंगी त्यांनी सांगितले. महंत यांनी गडाची पंढरपुरात जागा असावी अशी इच्छा बोलून दाखवली होती, त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे.आपण सर्वजण एकच आहोत. महाराजांनी बोलावले नाही तरी पुढील वर्षी मी येणारच असून प्रसाद घेऊनच जाईल,असे शेवटी फडणवीस म्हणाले.
यावेळी बीडचेपालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, मागील वर्षी माझा अपघात झाला होता, त्यामुळे येता आले नाही. कदाचित नियतीला मी मंत्री होऊन आणि माझ्या भगिनी सोबत तुमचे स्वागत करण्याचे भाग्य प्राप्त होणार होते. म्हणून येता आले नाही., गेली पंचवीस वर्षे खंड पडू न देता गडावर येत आहे. गडाच्या विकास कामासाठी दिलेला निधी कोरोनामुळे वापरता आला नाही . परंतु आज त्या कामाचे भूमीपूजन केले आहे. लवकरच हि सर्व विकास कामे पूर्ण होतील. वारकरी संप्रदायाची सुरवात गहिनीनाथ महाराज यांच्या पासून झालेली आहे.त्यामुळे या गडाला विशेष महत्त्व आहे.
सर्वच गडाची प्रतिष्ठा हि आम्हा पुढाऱ्यामुळे नाही, तर ऊस तोडून, पुण्यतिथी साजरी करण्यासाठी गडांना भरभरून देणगी देणाऱ्या जनतेमुळे आहे. असे मुंडे यांनी सांगितले.
यावेळी खा. प्रीतमताई मुंडे यांनी प्रास्ताविकात सर्व पाहुण्यांचे स्वागत करून गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.
वंचित बहुजन चे प्रकाश आंबेडकर यावेळी बोलतांना म्हणाले की,संतांचे महात्म्य आपल्याला मान्य करावेच लागेल कारण त्यांनीच आपल्या कार्यकाळात जाती जाती मधले अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच आज जाती अंत होतांना दिसत आहे.हभप. विठ्ठल महाराज यांनी ती परंपरा कायम ठेवली आहे. याचा मला आनंद वाटत आहे.आपण असेच सर्वजण समतेने बंधुतेने राहावे अशी अपेक्षा आहे. असे आंबेडकर म्हणाले.यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे ही भाषण झाले.
याप्रसंगी आ.बाळासाहेब आजबे,माजी मंत्री सुरेश धस, मा.मंत्री राम शिंदे, आ.मोनिका राजळे, आ.भीमराव धोंडे, पत्रकार विलास बडे, गहिनीनाथ शिरसाठ, डॉ राजेंद्र खेडकर, डॉ,नेहरकर ,गणेश कराड, वाल्मीक निकाळजे,बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे,जिल्हा पोलीस अधीक्षक आदींसह लाखो भाविकाची यावेळी उपस्थिती होती.
0 टिप्पण्या