Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगावमध्ये दत्तजयंती भक्तीभावाने साजरी


































लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क)



अहमदनगर (प्रतिनिधी) : 
अष्टांगयोग योगतज्ञ प.पू.दादाजी वैशंपायन यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेवगावच्या दत्त पंढरीत दत्त जन्मोत्सवाचा सोहळा भक्ती भावाने साजरा झाला.कुडकुडणार्‍या थंडीतही भाविक - भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
      सकाळी मुख्य संगमरवरी प्रसन्न,तेजोमय मूर्तीवर पंचसूक्त पवमान अभिषेक घालण्यात आला.दुपारी पालखी सोहळा झाला.सायंकाळी श्री.दयानंद महाराज कोरेगावकर यांचे दत्त जन्मोत्सवाचे सुश्राव्य कीर्तन झाले.आ.मोनिका राजळे व तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या हस्ते महारती झाली.
      ज्येष्ठ. साधक शरद वैशंपायन ,सौ.ललिता वैशंपायन, रवींद्र पुसाळकर,वृषाली पुसाळकर,अतुल पवार,राजेश मेसवानी आदी यावेळी उपस्थित होते.गुरुदत्त संस्थेचे अध्यक्ष अर्जुन फडके,सचिव फुलचंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सेवाभावी कार्यकर्त्यांनी उत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या