Ticker

6/Breaking/ticker-posts

योग्य लोकप्रतिनिधी निवडून आल्यास जनतेसाठी प्रामाणिक काम करतो : खा. विखे पाटील

 लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


कोळगाव : प्रतिनिधी

आपला गावचा विकास कसा होईल व जास्त निधी आपल्या गावासाठी कसा मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतो आपण योग्य सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो, व आपल्या गावासाठी जास्तीत जास्त निधी आणून प्रामाणिक प्रयत्न करत असतो असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले 


कोळगाव तालुका श्रीगोंदा येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व साखर वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संदीप नागवडे, बाळासाहेब नलगे, दिनकर पंदरकर, बाळासाहेब गिरमकर, अजित जामदार, संतोष लगड, अमित लगड, अकील इनामदार, लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड तसेच सैनिक संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


        पुढे बोलताना खासदार विखे यांनी आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून कोळगाव मध्ये 33 कोटी रुपयांची विकास कामे होत आहेत.  आपण विकासाला प्राधान्य द्याल तर आपल्या मुलांचे उज्वल भविष्य घडेल. नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत दहा वर्ष मागे होता पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नगर जिल्हा विकास कामाच्या बाबतीत पाच वर्ष पुढे नेऊन ठेवला असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रस्त्यांचे काम आज नगर जिल्ह्यात झाले असल्याचे मत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.


        साकळाई योजने संदर्भात अनेक वर्ष राजकारण झालं, अनेकांची भाषणे झाली मात्र आमदार पाचपुते,  कर्डिले साहेब व माझ्या माध्यमातून साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊन 794 कोटी रुपयाची येत्या जानेवारी महिन्यात प्रशासकीय मान्यता घेऊन लवकरच तेही काम पूर्ण होईल अशी ग्वाही यावेळी ग्रामस्थांना दिली


यावेळी बोलताना विक्रमसिंह पाचपुते म्हणाले  गावच्या विकासामध्ये भर पडायचे असेल तर रस्ते झाले पाहिजे रस्ते झाल्याने दळणवळण वाढते व गावच्या विकासाला प्रारंभ होतो येथे तीन ते चार महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याचे स्वरूप बदलून जाईल व विकास होत असताना गावकऱ्यांचा हातभार लागल्याने विकासामध्ये अधिक भर पडते खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी साखर वाटपाचा अभिनव उपक्रम केला असल्याचे बोलत खा.विखे यांचे अभिनंदन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या