Ticker

6/Breaking/ticker-posts

मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये धुम:श्चक्री..!


लाठया-काठ्यांनी दोन गटात तुंबळ हाणामारी ; जिल्ह्यात खळबळ 

अध्यक्ष संजय मरकड यांच्यासह 10
गंभीर जखमी

 

  

लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क


पाथर्डी/ नगर: पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून अनेक दिवसापासून सुप्त संघर्ष धुमसत होता. त्याचा भडका अखेर आजच्या बैठकीत उडाला. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर दोन गटात तुंबळ  हाणामारीत झाले. अध्यक्ष बदलावरून  जबर राडा झाला. ही घटना आज दि. 14 रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली.  त्यामुळे एकच खळबळ उडाली .

याबाबत मिळालेली माहिती अशी,  अध्यक्ष बदलावरून अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती . त्याबाबत बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये गावातील तरुणांचा सहभाग होता. यामुळे विश्वस्तांसह काही तरुण देखील रक्त बंबाळ झाले. बैठकीसाठी उपस्थित असलेले अध्यक्ष आणि त्यांचा मित्रपरिवार यांना मोठ्या प्रमाणात मारहाण झाली असून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. 

अध्यक्ष संजय मरकड यांना जबरदस्त मारहाण झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे घटनेनंतर जखमींना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दोन्ही बाजूचा मोठा जमाव  जमलेला होता.  त्यामूळे तनावपूर्ण वातावरण होते. मढितही तणावपूर्ण शांतता आहे. 

मुद्द्यांवरुन थेट गुद्दावर 
जिल्ह्यातील धार्मिक क्षेत्रांनाही राजकारणाचा रंग आणि गंध येऊ लागला आहे.  किंबहुना आपल्या मर्जीतील समर्थकांचि वर्णी लावण्याचे काम राजकारण्यांकडून सर्रास करण्यात येत आहे.  त्यामुळे  पवित्र्य धार्मिक स्थळे आता  राजकारणाचा अड्डा बनत  चालले आहेत. परिणामी ते मुद्द्यांवर न थांबता थेट  गुद्दावर आले  असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.  ही अत्यंत खेदाची बाब आहे. भाविकांमध्ये मात्र  संतापाची लाट पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या