Ticker

6/Breaking/ticker-posts

वडगाव गुप्ताच्या नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी घेतली खा. सुजय विखे यांची भेट

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर (प्रतिनिधी):काल वडगाव गुप्ता ता. नगर येथील नवनिर्वाचित सरपंचांसह सदस्यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांची भेट घेतली.


वडगाव गुप्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून गावात खा. सुजय विखे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले भाजप प्रणित समृद्धी ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयाचा जल्लोष साजरा करत निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन आनंद साजरा केला. 


दरम्यान खा. विखे यांनी नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा अतिशय उत्साहात सत्कार केला व त्यांना भावी राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देऊन गावाचा विकास साध्य करण्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन केले.


यावेळी सरपंच सोनुबाई विजय शेवाळे, सदस्य  बाळासाहेब गंगाधर डोंगरे, आशाबाई दत्तात्रय शेवाळे, बाळू धोंडीराम शिंदे, विजय मुरलीधर शेवाळे, ज्ञानदा शिवाजी घाडगे, डोंगरे उमेश अशोक, सुवर्णा दत्तात्रय आंबेडकर, योगेश मच्छिंद्र निकम, सुनिता बाबासाहेब गव्हाणे, मिराबाई रावसाहेब डोंगरे, हूसेन गुलाब सय्यद, जिजाबाई प्रल्हाद डोंगरे, मिराबाई राजेंद्र शेवाळे आदी विजयी उमेदवार उपस्थित होते.


खा. सुजय विखे यावेळी म्हणाले की, वडगाव गुप्ता या गावासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. जी विकासाची वाटचाल सध्या सुरू आहे ती अशीच निरंतर चालू राहील असा विश्वास व्यक्त केला. 


तसेच सर्व विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना खासदार सुजय विखेंनी स्पष्ट केले की, जनतेने आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थकी लावून जनतेच्या विविध अडचणी समजून घेण्याचे काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं पाहिजे व जनतेचे सेवक म्हणून प्रामाणिक काम आपल्या माध्यमातून घडावे. असे मत मांडत त्यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला आणि विजयाचा उत्साह द्विगुणित केला.


याप्रसंगी जालिंदर डोंगरे, शामराव पिंपळे, भिमराज गव्हाणे, बाळासाहेब डोंगरे, एकनाथ मोरे, नारायण शिंदे, बाबासाहेब गव्हाणे, हरीभाऊ शेवाळे, रामबाबा शेवाळे, डाॅ. बापु पवार, भिमराज डोंगरे, बापु गव्हाणे, बाळू गव्हाणे, सुजित डोंगरे, पुजा डोंगरे, अशोक शेवाळे, विकास शेवाळे, अनिल शेवाळे, अशोक आंबेडकर, दत्तात्रय शेवाळे, रावसाहेब घाडगे, शिवाजी घाडगे, गोरक्षनाथ शेवाळे, देवीदास डोंगरे, रंगनाथ गिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या