लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
टाकळी मानूर :(विक्रम केदार)
- वडिलांचे निधन झाले असतानाही ते दुःख बाजूला सारत राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी दिवाळीचा सण ऊसतोड मजुरांच्या फडात घालत मजुर व त्यांच्या कुटंबियांना मिठाई ,मुलांना फटाके देत त्यांचा आनंद द्विगुणित केला.अचानक मिळालेल्या या भेटीने मजुरांची दिवाळी गोड झाली.
मागील पंधरा दिवसांपूर्वी प्रतापराव ढाकणे यांचे वडील व माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांचे दुःखद निधन झाले. ऐन दिवाळी व पाडवा सणाच्या दिवसात ही घटना घडल्याने सध्या प्रतापराव ढाकणे व त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली असून स्व.बबनराव ढाकणे यांना राज्यासह परराज्यात मानणारा मोठा वर्ग सध्या प्रतापराव ढाकणे यांचे सांत्वन करण्यासाठी पाथर्डी येथे येत आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रतापराव ढाकणे अस्वस्थ असले तरीही त्यांनी काल दिवाळीच्या दिवशी तालुक्यातील गाडेवाडी,जवळवाडी व खरवंडी कासार येथे असलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोपीत जाऊन त्यांना मिठाईचे वाटप करत त्यांच्या मुलांना फटाके देत त्यांची आस्थेने चौकशी केली. ऐन दिवाळीच्या दिवशीच मिठाई व फटाके मिळाल्याने मजुरांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला.
यावेळी ढाकणे यांच्या समवेत गहिनीनाथ शिरसाठ,सिद्धेश ढाकणे,किरण खेडकर, वैभव दहिफळे,राजू नागरे,संदीप शिंदे,सहदेव शिरसाठ,हरिभाऊ मोरे,बबन पवार,मोहन शेळके,राजेंद्र शिरसाठ,शिवाजी बडे,एम पी आव्हाड,महंमद शेख,दादासाहेब बारगजे,राजेंद्र जगताप,अमित खाडे हे उपस्थित होते.सध्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम चालू झाला असून तालुक्यातील अनेक ठिकाणचा मजुर ऊस तोडण्यासाठी परजिल्ह्यातून मोठ्या संख्येने तालुक्यात उसतोडण्यासाठी आले आहेत. या सर्वांशी संवाद साधत प्रताप ढाकणे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस करत त्यांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रताप ढाकणे म्हणाले उपेक्षित वंचित ऊस तोडणी कामगारांच्या बळावरच स्वर्गीय बबनराव ढाकणे यांनी काम केले त्यांच्या निधनानंतर त्यांचे आदर्श वाटचालीवर काम करत आज मी या उसाच्या फडात आलो आहे.या घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी संपूर्ण आपले जीवन वेचले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. तो घटक शासकीय आणि कायदेशीर दृष्ट्या उपेक्षित होता त्यांच्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केले व त्यांना कायदेशीर अधिकार मिळवून दिला याची जाणीव आज संपूर्ण महाराष्ट्राला आहे आज मी दुःखात असलो तरी त्यांनी ज्या वर्गासाठी काम केले स्वतःचे दुःख पचवून कष्टकरी माणसं सुखात राहिले पाहिजे अशी त्यांची धारणा होती.आज त्यांच्या पहिल्या जयंतीनिमित्ताने मी आज त्यांच्याच घालून दिलेल्या वाटचालीवर काम करत आहे.इथून पुढे असेच काम माझ्याकडून होत राहतील. मी आज ऊस तोडणी कामगारांच्या फडात आलो असलो तरी माझ्या कुटुंबात सहभागी झालो असा अनुभव मला प्राप्त होत आहे. आणि ढाकणे साहेबांची आठवण नितांत राहील. स्वतःच्या वडिलांचे दुःखद निधन झाले असतानाही प्रतापराव ढाकणे यांनी मजुरांची दखल घेत त्यांना शुभेच्छा देतानाच मिठाई व फटाके दिल्याने मजुरांनी सुद्धा प्रतापराव ढाकणे यांचे मनापासून आभार मानले.
0 टिप्पण्या