Ticker

6/Breaking/ticker-posts

ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंगच्या राज्य उपाध्यक्षपदी पै. राजकुमार आघाव पाटील

लोकनेता  न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क )  


अहमदनगर (प्रतिनिधी)- युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची मान्यता असलेल्या ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंग महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी पै. राजकुमार लक्ष्मण आघाव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष सी.ए. तांबोळी यांनी आघाव पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी उमर मुख्तार तांबोळी उपस्थित होते.


पै. राजकुमार आघाव पाटील नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथील असून, त्यांनी जागतिक कुस्तीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना तीन वेळा कास्य पदक पटकाविले आहे. ते एक उत्तम कुस्तीपटू असून, नवोदित कुस्तीपटूंना ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी मार्गदर्शन करत असतात. तसेच कुस्ती खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी सातत्याने त्यांचे कार्य सुरु आहे. 

त्यांच्या कार्याची दखल घेऊन आघाव पाटील यांची संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जिल्हा सचिव संतोष खैरनार व जिल्हाध्यक्ष संतोष भुजबळ यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. आघाव पाटील यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या