नुजिविडू सीड्स तर्फे नवनीत कपाशी पीक पाहणी कार्यक्रम
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : अलीकडच्या काळात कापसाचे आगार अशी वरुरच्या शेत शिवाराची ओळख आहे. येथील शेतकरी मेहनती असल्याने उत्पादन वाढीसाठी त्यांना माती परीक्षण ,बियाणे निवड तसेच खते व किडरोग व्यवस्थापन याबाबत सर्वोतपरी मार्गदर्शन केले जाईल, असे प्रतिपादन नुजिविडू सीड्स कंपनीचे जिल्हा मॅनेजर शुभम शेळके यांनी केले.
वरुर,(ता.शेवगाव) येथील प्रगतशील शेतकरी दशरथ म्हस्के यांच्या शेतावर नुजिविडू सीड्स कंपनीच्या नवनीत कपाशी वानाच्या पीक पाहणी कार्यक्रम मेळाव्यात श्री.शेळके बोलत होते. शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ गोसावी अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर सुनील वावरे, गणेश बेडके,चंदू भुजबळ, तुळशीराम राऊत, भाऊसाहेब वावरे तसेच वैष्णवी व शिवशक्ती कृषी सेवा केंद्राचे संचालक अनुक्रमे लक्ष्मण चेडे व शुभम म्हस्के आदी उपस्थित होते.
कमी कालावधीत वेचणीस येणाऱ्या व रसशोषक किडीस अल्प प्रमाणात बळी पडणाऱ्या नवनीत कपाशी वानाने दोन वर्षापासून शेवगाव - पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना भुरळ घातली आहे. वरुरच्या गोकुळ पठाडे या शेतकऱ्याने एक एकरात १९ क्विंटल कापसाचे विक्रमी उत्पादन घेतल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्याचे श्री.शेळके म्हणाले. कार्यक्रमास मार्केटिंग ऑफिसर आकाश वाघमारे, अमित ढोले तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी शेतकरी दशरथ म्हस्के यांचा भेटवस्तू देऊन कंपनीतर्फे सन्मान करण्यात आला.
0 टिप्पण्या